Advertisement

बिरसा फायटर्सचा जाहीरनामा ठरतोय लक्षवेधी

पैसे वाटणा-यांना मतदान करू नका,जनजागृतीचा संदेश


शहादा: नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी नुकताच आपला बिरसा फायटर्सचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.जाहीरनाम्यात एकूण २८ मुद्द्यांचा समावेश आहे.हा जाहीरनामा जनतेचा लक्षवेधी ठरतोय, कारण या जाहीरनाम्यात आपले मत अमूल्य आहे, पैसे वाटणा-यांना व देणा-यांना मतदान करू नका.असा स्पष्ट जनजागृतीचा संदेश देण्यात आला आहे.मतदार हा राजा आहे.मतदान करणे हे देशसेवा आहे.मतदान करणे हा आपला महत्वाचा हक्क व अधिकार आहे.लोकशाहीने आपल्याला अनेक सुविधा,हक्क-अधिकार दिले आहेत. दर पाच वर्षांनी होणा-या लोकसभा निवडणूकीत मतदारांनी बजावलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासनाची स्थापना होते.
                       मुक्त व निर्भीड वातावरणातून मतदारांनी मतदान करायला पाहिजे.निवडणूकीच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला, दबावाला बळी न पडता आपल्याला मतदानाचा अधिकार बजावता आला पाहिजे.१८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक युवतींना मतदान करण्याचा हक्क आहे. नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे हे मतदानाच्या माध्यमातून कळते.देशाच्या विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे.देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता येईल यासाठी लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीं हे सक्षम असणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदारांनी विचारपूर्वक आपला मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे.
                 नुसत्या भेटीगाठी,आश्वासने आणि आर्थिक आमीश देणा-यांना तुम्ही मत देणार का?हा प्रश्न तुम्ही प्रत्येकाने स्वत;ला विचारायला पाहिजे.कुणाला मतदान करायचे हे ठरविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.आजही अनेक लोक आहेत, ज्यांना मतदानाचे महत्त्व कळत नाही . देशात अशाच काही लोकांमुळे चुकीचे लोकप्रतिनिधी निवडले जातात. देशाचा विकास योग्य पद्धतीने होत नाही.मतदारांनी येणा-या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावून सार्वभौम व शक्तीशाली राष्ट्र बनवण्यास सहकार्य करावे.असे जाहीर आवाहन अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments