Advertisement

बिरसा फायटर्सची ३५९ वी गांव शाखा डाबरखेडा येथे सुरू

शहादा प्रतिनिधी : शहादा तालुक्यातील डामरखेडा येथे बिरसा फायटर्सची नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे.या गाव शाखा कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून भाईदास ठाकरे यांची निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष म्हणून आकाश माळीच यांची निवड करण्यात आली आहे.कार्याध्यक्ष कैलास पवार,कोषाध्यक्ष मायकल बागूल ,सचिव गणेश मोरे,सहसचिव नरेश शेमळे ,सल्लागार किशोर ठाकरे ,महिला प्रतिनिधी मंजना मोरे,संघटक विष्णू ठाकरे,प्रसिद्धीप्रमुख आकाश माळी,सदस्य म्हणून कैलास पवार,सिताराम माळी,शिवनाथ पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
                 नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ,अशा शुभेच्छा बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिल्या आहेत.तसेच राज्य ,विभागीय, जिल्हा ,तालुका,गाव शाखेतील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अभिनंदन केले आहे.बिरसा फायटर्स गाव शाखा डामरखेडा या शाखेत तरूण मुल व काही ग्रामपंचायत सदस्य आहेत. बिरसा फायटर्सच्या कामांना प्रभावित होऊन नवीन शाखा होत आहेत. बिरसा फायटर्स ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी अग्रेसर संघटना आहे.आमचे काम निरंतर सुरूच आहे,काम कधीच थांबणार नाही,म्हणून संघटनेच्या दिवसेंदिवस शाखा वाढतच चालल्या आहेत. समाजाची एकता वाढवण्यासाठी बिरसा फायटर्स संघटनेत शामिल व्हा,असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments