Advertisement

पक्ष नेत्यांची खिचडी; अपक्ष उमेदवारच आवडी

काँग्रेस व भाजप सरपंचांचा सुशिलकुमार पावरा यांना खुला पाठिंबा!

शहादा :नंदूरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना शहादा,शिरपूर, धडगांव, अक्कलकुवा,साक्री ,नवापूर,तळोदा ,नंदुरबार अशा ८ तालुक्यातील अनेक गांवांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. लोकसभाश्रॆत्रात सुशिलकुमार पावरा हे गांवोगांवी दौरे करत आहेत. पक्ष न बघता सगळ्यांनाच भेटत आहेत.अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना काँग्रेस व भाजप तसेच इतर पक्षातील अनेक ग्रामपंचायती सरपंचांचा पाठिंबा मिळत आहे.काँग्रेसचे काही नेते भाजपात व भाजपचे काही नेते काँग्रेस मध्ये प्रवेश करीत आहेत.त्यामुळे पक्षांच्या नेत्यांची खिचडी तयार झाली आहे.एकाच पक्षातीलच ४-५ उमेदवारांनी नामनिर्देशन फाॅर्म घेतले आहेत. त्यामुळे कोणाचा पाठिंबा कोणाला? कोण कुठे राहिल?कोण कोणाला मतदान करेल? याची गॅरेंटी नाही.मात्र अपक्ष उमेदवाराला काँग्रेस व भाजप तसेच इतर पक्षांचे सरपंच, पुढारी व कार्यकर्ते स्वीकारत आहेत. काँग्रेस पक्षाचे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिरीषदादा नाईक यांची बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा व त्यांची २० बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. सुशिलकुमार पावरा यांना नंदूरबार लोकसभा निवडूक जिंकण्यासाठी शुभेच्छा मिळाल्या आहेत. 
                       सुशिलकुमार पावरा यांना ५८ पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे.विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला.मराठा समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे.मुस्लिम बांधवांचाही पाठिंबा मिळाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करणार, असा ठाम निर्धार चूलवड ग्रामस्थांनी केला आहे.साखर कारखाना कामगार व शेतक-यांनीही पाठिंबा दिला आहे.स्थलांतरित मजूरांनीही आम्ही सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करायला येणार, असे म्हणत पाठिंबा दर्शविला आहे.अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना विविध समाजातील लोकांचा दिवसेंदिवस पाठिंबा मिळत आहे.पक्षांच्या नेत्यांना कंटाळून पक्षांच्या उमेदवारांपेक्षा सुशिलकुमार पावरा यांना अधिक पसंती मिळत आहे.त्यामुळे नंदूरबार लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे १०० टक्के जिंकतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments