Advertisement

बिरसा फायटर्सची तुफान बाईक रॅली दणक्यात

शहादा:नंदूरबार लोकसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेस उमेदवारांना टक्कर देणारे एकमेव लोकप्रिय अपक्ष उमेदवार मा.सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांचा नामांकन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिनांक :२३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता नवापूर चौफूली ते जिल्हाधिकारी नंदुरबार 
पर्यंत तुफान बाईक रॅली काढण्यात आली.या रॅलीत स्वईच्छेने व स्व: खर्चाने हजारोंच्या संख्येने नंदूरबार जिल्ह्य़ातील बांधव उपस्थित होते.
               यावेळी बिरसा फायटर्स संघटनेकडून गोपाल भंडारी यांचाही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यात आला. काही तांत्रिक कारणांमुळे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.सुशिलकुमार पावरा यांचा उमेदवारी अर्ज दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी दाखल करण्यात येणार आहे. रॅलीत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,राज्य सचिव संजय दळवी,कोकण विभाग प्रमुख राजाभाऊ सरनोबत, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,जिल्हा संघटक हिरामण खर्डे आदि हजारों बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते.सुशिलदादा तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है,कोण म्हणतो येणार नाय, आल्याशिवाय राहणार नाय,कोण म्हणतो निवडणार नाय,निवडल्याशिवाय राहणार नाय,आवाज कुणाचा,बिरसा फायटर्सचा,लढेंगे और जितेंगे,अपक्ष उमेदवारही जितेंगे!अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.रॅलीत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.बिरसा फायटर्स संघटनेची रॅलीत स्वईच्छेने व स्वखर्चाने नंदूरबार लोकसभाश्रॆत्रातील बांधव उपस्थित होते.बिरसा फायटर्सची तुफान बाईक रॅली दणक्यात झाली.

Post a Comment

0 Comments