Advertisement

साखर कारखाना कामगारांचा व शेतकऱ्यांचाही अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना पाठिंबा

शहादा :नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात 
बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना शहादा येथील साखर कारखाना कामगारांनाचा व शेतकऱ्यांचाही पाठिंबा मिळत आहे. शहादा येथील साखर कारखाना गेल्या २ वर्षापासून बंद अवस्थेत आहे.या कारखान्यात ३६५ शेतक-यांचे करोडो रूपये बाकी आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे कारखान्याच्या मालकाने उद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे काही शेतकरी कर्ज बाजारी झाले आहेत. याबाबत साखर कारखान्यातील शेतकऱ्यांनी अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली.सुशिलकुमार पावरा हेच आपली समस्या सोडवू शकतात, या अपेक्षेने साखर कारखान्यातील शेतक-यांनी सुशिलकुमार पावरा यांचे समर्थन केले आहे.स्थलांतरित आदिवासी मजूर बांधवांनीही पाठिंबा दर्शविला आहे.
                       सुशिलकुमार पावरा यांना ५८ पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे.विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला.मराठा समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे.सर,आमचे पोस्टल मतदान तुम्हालाच, असे म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करणार, असा ठाम निर्धार चूलवड ग्रामस्थांनी केला आहे. शहादा,शिरपूर, धडगांव, अक्कलकुवा,साक्री तालुक्यातील अनेक गांवांचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे.त्यामुळे नंदूरबार लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे १०० टक्के जिंकतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments