Advertisement

सुशीलकुमार पावरा यांना तळोदा तालुक्यातील अनेक गांवांचा पाठिंबा


शहादा :नंदूरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना शहादा,शिरपूर, धडगांव, अक्कलकुवा,साक्री ,नवापूर या तालुक्यानंतर तळोदा तालुक्यातील अनेक गांवांचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे.पाठिंबा मिळालेल्या तालुक्यांची संख्या ७ झाली आहे.मुस्लिम बांधवांनीही पाठिंबा दर्शवला आहे.काँग्रेस पक्षाचे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिरीषदादा नाईक यांची बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा व त्यांची २० बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. सुशिलकुमार पावरा यांना नंदूरबार लोकसभा निवडूक जिंकण्यासाठी शुभेच्छा मिळाल्या.
                       सुशिलकुमार पावरा यांना  ५८ पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे.विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला.मराठा समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे.सर,आमचे पोस्टल मतदान तुम्हालाच, असे म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करणार, असा ठाम निर्धार चूलवड ग्रामस्थांनी केला आहे.साखर कारखाना कामगार व शेतक-यांनीही पाठिंबा दिला आहे.स्थलांतरित मजूरांनीही आम्ही सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करायला येणार, असे म्हणत पाठिंबा दर्शविला आहे.अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना पक्षांच्या उमेदवारांपेक्षा अधिक पसंती मिळत आहे.त्यामुळे नंदूरबार लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे १०० टक्के   जिंकतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments