Advertisement

धक्के पे धक्का; ट्रा पोलवरही गोवाल पाडवी व हिना गावित नापास, सुशिलकुमार पावरा पास

काँग्रेस व भाजप दोघांची मतांची बेरीज ३१६, अपक्ष उमेदवाराला मते १,०२१
शहादा:आगामी लोकसभा निवडणूकीत नंदूरबार लोकसभा मतदारसंघात तुमचे मत कोणाला,म्हणून भाजप व काँग्रेस गटाकडून स्ट्रा पोलची लिंक सोशल मिडीयावर टाकण्यात येत आहे.या ट्रा पोलवर काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी व भाजपचे उमेदवार हिना गावित हे नापास झाले आहेत. गोवाल पाडवी यांना २४६ मते तर हिना गावित यांना ७० मते पडली आहेत.तर अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे १०२१ मते मिळवून आघाडीवरच आहेत. ट्रा पोलवर लिंक वर भाजप व काँग्रेस अशे दोनच पर्याय देऊन भाजप व काँग्रेस पक्षवाले मनमानी पद्धतीने जिंकण्याचा अंदाज धरण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचा हा अंदाज अपक्ष उमेदवारामुळे फेल ठरत आहे.कारण सोशल मिडीयावर सुद्धा अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हेच नंदूरबार लोकसभेची निवडणूक जिंकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे हा पोलींग वोटचा निकाल सुद्धा काँग्रेस व भाजप उमेदवारांना धक्का देणारा व आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज देणारा ठरला आहे. अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे काँग्रेस व भाजप उमेदवारांना धक्के पे धक्का देत आहेत.
             भाजप सरकार कडून आदिवासी विरोधीधोरण यामुळे आदिवासी बहूल असलेल्या नंदूरबार जिल्ह्य़ात भाजपविरोधी वातावरण निर्माण झाले आहे,त्यामुळे आदिवासी मतदारांची मते भाजपच्या उमेदवार हिना गावित यांना मिळणार नाहीत, असे चित्र दिसत आहे.काँग्रेसचे अक्राणी अक्कलकुव्याचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी आपल्या ३५ वर्षांच्या कालावधीत त्यांच्या स्वतःच्या असली या गावात सुद्धा जायला रस्ता केला नाही,तो माणूस काय जिल्ह्य़ाचा विकास करेल?अक्राणी व अक्कलकुवा मतदारसंघात अद्यापही खड्डेमय रस्ते आहेत.त्यामुळे सुपूत्र गोवाल पाडवी यांनाही मतदार नाकारत आहे.त्यामुळे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हेच बाजी मारतील असे चित्र निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments