Advertisement

छत्रपती संभाजी नगर उपशहर प्रमुख पदी विजय पैठणे यांची निवड

 छत्रपती संभाजी नगर भागातील पदमपुरा येथे या आधी विजय पैठणे विभाग प्रमुख म्हणून काम पाहत होते. या विभागात त्यांनी बरेचसे सामाजिक कार्य पार पाडले व आपल्या विभागाच्या विकासासाठी ते सतत झटत होते. आमदार संजयजी शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन छत्रपती संभाजी नगर येथील विविध विकास कामांमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यांची या कामांची दखल घेत शिवसेनेने त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी म्हणून वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार व खासदार श्रीकांत जी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजी नगर *उपशहर प्रमुख* पदी निवड करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ. आमदार संजय शिरसाट. विकास जैन. संतोष मरमट. गजानन बारवाल. सतीश माहोरे व बरेचसे शिवसैनिक उपस्थित होते या विभागात बऱ्याचशा शिवसैनिकांना विविध पदांवर नियुक्त करण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी शिंदे गटातर्फे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे

Post a Comment

0 Comments