Advertisement

सुशिलकुमार पावरा यांना अपक्ष उमेदवारांचाही खुला पाठिंबा!

*साक्री तालुक्यातून लीड मिळवून देऊ: डोंगरू बहिरम* 

शहादा :नंदूरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना साक्री तालुक्यातील डोंगरू बहिरम यांनी खुला पाठिंबा दर्शविला आहे.सुशिलकुमार पावरा यांना आम्ही पाठिंबा जाहीर जाहीर करतो. सुशिलकुमार पावरा यांनी आदिवासी समाजासाठी व नंदुरबार जिल्ह्य़ातील लोकांसाठी खूपच उल्लेखनीय कामे केली आहेत. त्यांनी मोठा संघर्ष केला आहे.आम्ही साक्री तालुक्यातून सुशिलकुमार पावरा यांना जास्तीत जास्त मते मिळवून देऊन विजयी करू.सुशिलकुमार पावरा हे दमदार उमेदवार आहेत, त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. असे आवाहन नंदुरबार लोकसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार डोंगरू बहिरम यांनी केले आहे.सुशिलकुमार पावरा यांना शहादा ,शिरपूर, धडगांव, अक्कलकुवा,साक्री ,नवापूर,तळोदा ,नंदुरबार अशा ८ तालुक्यातील अनेक गांवांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. 
                       सुशिलकुमार पावरा यांना ५८ पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे.विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला.मराठा समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे.मुस्लिम बांधवांचाही पाठिंबा मिळाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करणार, असा ठाम निर्धार चूलवड ग्रामस्थांनी केला आहे.साखर कारखाना कामगार व शेतक-यांनीही पाठिंबा दिला आहे.स्थलांतरित मजूरांनीही आम्ही सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करायला येणार, असे म्हणत पाठिंबा दर्शविला आहे.अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना विविध समाजातील लोकांचा दिवसेंदिवस पाठिंबा मिळत आहे.पक्षांच्या नेत्यांना कंटाळून पक्षांच्या उमेदवारांपेक्षा सुशिलकुमार पावरा यांना अधिक पसंती मिळत आहे.काँग्रेस व भाजप व इतर पक्षांतील सरपंचांनीही सुशिलकुमार पावरा यांना खुला पाठिंबा दाखविला आहे.त्यामुळे पक्ष व अपक्षांच्या मदतीने नंदूरबार लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे १०० टक्के जिंकतील,अशी भविष्य वर्तविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments