Advertisement

सुशिलकुमार पावरा यांच्या नामांकनासाठी २३ एप्रिल २०२४ रोजी तुफान बाईक रॅली

*५०० बाईक रॅलीत शामिल होणार- गोपाल भंडारी*

शहादा :नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांचे अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी बिरसा फायटर्स संघटनेकडून तुफान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या रॅलीत ५०० पेक्षा अधिक बाईक रॅलीत शामिल होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात काँग्रेस व भाजप उमेदवारांना टक्कर देणारे एकमेव लोकप्रिय अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांच्या नामांकन साठी बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे.तरी या बाईक रॅलीत जास्तीत जास्त बांधवांनी सहभागी व्हावे,असे आवाहन गोपाल भंडारी बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी केले आहे.बाईक रॅलीचे परवानगी पत्र जिल्हाधिकारी नंदुरबार, पोलीस अधीक्षक नंदूरबार, पोलीस निरीक्षक नंदूरबार व तहसीलदार नंदूरबार यांना देण्यात आले आहे.
           सुशिलकुमार पावरा यांना शहादा,शिरपूर, धडगांव,अक्कलकुवा,साक्री ,नवापूर,तळोदा ,नंदुरबार अशा ८ तालुक्यातील अनेक गांवांचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे.तसेच ५८ पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे.विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला.मराठा समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे.सर,आमचे पोस्टल मतदान तुम्हालाच, असे म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करणार, असा ठाम निर्धार चूलवड ग्रामस्थांनी केला आहे.साखर कारखाना कामगार व शेतक-यांनीही पाठिंबा दिला आहे.स्थलांतरित मजूरांनीही आम्ही सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करायला येणार, असे म्हणत पाठिंबा दर्शविला आहे.मुस्लिम बांधवांनीही पाठिंबा दिला आहे.त्यामुळे नंदूरबार लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे १०० टक्के जिंकतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या नामांकनासाठी आयोजित तुफान बाईक रॅली बघण्यास जनता उत्सुक झाली आहे.

Post a Comment

0 Comments