Advertisement

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने रांजणगाव गणपती येथे उत्सव


रांजणगाव महागणपती या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व धर्म समभाव व एक गाव एक जयंती असा उपक्रम राबविण्यात आला. सर्व पक्षांचे नेते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला व त्यांनी एकत्रित येऊन भीम जयंती पार पाडली. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व भीम सैनिकांनी एकत्रित येऊन ही जयंती पार पाडली. या जयंती मध्ये भिमकन्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. तसेच कारेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व सहकारी यांनी मिळून ट्राफिक सुरळीत करण्या स मोलाची मदत केली. जयंतीच्या मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर आलेल्या भीमसैनिकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. व संगीताचा कार्यक्रम संपल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments