Advertisement

बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल!मणिपूर घटनेचा निषेध!

नंदूरबार जिल्हा बंद;समाजकंटकांवर संशय!

समाजासाठी १०० गुन्हे अंगावर घ्यायला तयार: किसन वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष
नंदूरबार:मणिपूर येथील २ आदिवासी महिलांना निर्वस्त्र करत रस्त्यावर एका जमावाने धिंड काढल्याच्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक २६ जुलै २०२३ रोजी समस्त आदिवासी समुदाय जिल्हा नंदूरबार च्या वतीने जिल्हा बंद पुकारण्यात आला होता.यात बिरसा फायटर्स ही आदिवासींची एक आक्रमक संघटनाही शामिल झाली होती.या दिवशी धडगाव, अक्कलकुवा,तळोदा,शहादा,नवापूर व नंदूरबार अशा ६ तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.बिरसा फायटर्स च्या जिल्ह्य़ातील एकूण १०० पेक्षा अधिक गाव शाखा शामिल झाल्या होत्या.यात नंदूरबार तालुक्यातील धानोरा गावात किसन वळवी तालुकाध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या नेतृत्वाखाली कडकडीत बंद पाळण्यात आला. या कडकडीत बंद मध्ये धानोरा येथील क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथे बिरसा फायटर्स व काही कार्यकर्त्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाले,अशी तक्रार एका इसमाने उपनगर पोलीस ठाणे नंदुरबार येथे दिली.त्यानुसार बिरसा फायटर्सचे तालुकाध्यक्ष किसन वळवी,विवेक वसावे,
रूस्तम वळवी, प्रफुल्ल वसावे,
गणेश वसावे ,मनोज पाडवी,दिपक वळवी,जितेंद्र वसावे, भानुदास वळवी, संजय वळवी इत्यादी ११ जणांविरुद्ध महाराष्ट्र राज्य कायदा कलम ३७ - १,३ चे उल्लंघन १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास फौजदार जगन वळवी करीत आहेत. 
                आम्ही कुठल्याही प्रकारच्या नियमाचे उल्लंघन केले नाही.आदिवासी महिलांवर अमानवीय अत्याचारांविरोधात आमचा हा आक्रोश राग लोकशाही मार्गाने आम्ही व्यक्त केला आहे.आमचे हे आंदोलनाचे फोटो कुणी तरी सोशल मिडीयावर अपलोड केले व आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.समाजासाठी एक काय शंभर गुन्हे अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे नंदूरबार तालुकाध्यक्ष किसन वळवी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments