Advertisement

नंदुरबारचे शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्याबद्दल नाराजी

सतीश चौधरी यांचे डोकं ठिकाण्यावर नाही,त्यांनी वर्तनात सुधारणा करावी: सुशिलकुमार पावरा
मला वेळ नाही व शिक्षक भरतीबद्धल माहीती नाही! ही कुठली भाषा?

नंदुरबार:नंदुरबार जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांवर मानधन तत्त्वावर स्थानिक शिक्षकांची नेमणूक करावी,या मागणीचे निवेदन देण्यासाठी 22 बिरसा फायटर्स पदाधिका-यांनी जिल्हा परिषद नंदुरबार कार्यालय गाठले.निवेदन देण्यासाठी शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांची बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता,फटाफट बोला,मला वेळ नाही.अशी सुरवातीलाच निष्क्रियतेची भाषा शिक्षणाधिका-याने वापरल्याने बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी सतीश चौधरी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
                      शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी निवेदनावरचा विषय समजून न घेता कुणी तरी शालेय विद्यार्थी, पालक किंवा डी.एड.धारक विद्यार्थी आपल्याला भेटायला आले आहेत,असा स्वतःच गैरसमज करून मला वेळ नाही,अशा उदासिनतेच्या भाषेत पदाधिकाऱ्यांशी बोलताना सुरवात केली.नंतर आम्ही बिरसा फायटर्स संघटनेचे पदाधिकारी आहोत, असे बोलल्यावर सतीश चौधरी यांचे डोके ठिकाणावर आले व व्यवस्थित बोलू लागले.
                ज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक d.ed,dt.ed,b.ed पात्रताधारक उमेदवारांमधून 9 हजार मानधन तत्त्वावर 700 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली.त्याचप्रमाणेच आपल्या नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा रिक्त शिक्षक पदांवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी भरती करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी केली.यावर शिक्षणाधिकारी म्हणाले की,आम्ही वरून पत्र आल्यावरच कामे करतो.जिल्हा स्तरावर काहीच करीत नाही.परिपत्रकानुसार सेवानिवृत्त शिक्षकांना नेमणूक करण्याचे काम सुरू आहे.रत्नागिरी जिल्ह्यात 700 शिक्षक भरण्यात आले हे मला माहीत नाहीत.तुम्ही डी.एड.झालेले विद्यार्थी आहेत का?फटाफट काय आहे ते द्या.मला वेळ नाही.यावर आम्ही बिरसा फायटर्स संघटनेवाले आहोत, विद्यार्थी नाहीत.300 ते 400 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळेत 4-5 शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत.अशा शाळांवर जिल्हा स्तरावर शिक्षक नेमण्यात यावेत.
               शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना कुणाशी काय बोलायचे,याबद्दल भान नसते.जिल्ह्याची शैक्षणिक समस्या,विद्यार्थी व शिक्षकांची समस्या समजून घ्यायची मानसिकता व इच्छा त्यांच्यात नाही.शिक्षणाबद्धल उदासिन व बेजाबदार पणाने वागणारे हे शिक्षणाधिकारी आहेत. कुणाशी कसे वागावे व विषय कसा समजून घ्यायचा , हे शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून शिकावे.शिक्षणाधिका-याने आपल्या वर्तनात वेळीच सुधारणा न केल्यास आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना दणका देऊ,यापुढे वरिष्ठांकडे तक्रार करून सतीश चौधरी यांना शिक्षणाधिकारी पदावरून हटविण्याची मागणी करण्यात येईल, अशी आक्रमक प्रतिक्रिया जिल्हा परिषद समोर प्रसार माध्यमांशी बोलताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे धडगाव, अक्कलकुवा, तळोदा,शहादा,नवापूर व नंदुरबार तालुक्याचे तालुकाध्यक्षासह 22 पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments