Advertisement

आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने उपासमारीची पाळी

👉 वरिष्ठ अधिकारी झोपेच्या गर्तेत काय? 

👉 शासन आपल्या दारी या उपक्रमाने काय साध्य झाले? 

नागपूर/विशेष प्रतिनिधी, 
दिनांक १२ जुलै २०२३:-
 
महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागात मागील अनेक वर्षांपासून अल्पशा मानधनाच्या भरवशावर आपल्या परिवारातील सर्व जबाबदारी सांभाळीत जनतेला उत्तरदायी आरोग्य सेवा देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. तरीही शासन निर्णयानुसार त्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याबाबत गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिर्वाद कुमार यांना भ्रमणध्वनी वरुन विचारले असता त्यांनी 
" शासन आपल्या दारी " उपक्रमात व्यस्त असल्याचे कारण समोर करून खरे आणि रितसर उत्तर देण्याचे टाळले. शासन आपल्या दारी या दिखाऊ उपक्रमात सर्वसामान्य जनतेला आणि कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागला. बससेवा खंडीत झाल्याने प्रवाशांना ताटकळत प्रवासी वाहनांची वाट पहावी लागली. शासनाच्या या उपक्रमात लहान व्यवसाय करणाऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. मंत्री मात्र ऐंश आरामात दौरा करित राहिले. 
   महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करित असलेल्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना " केवळ अधिकाऱ्यांची स्वाक्षरी होत नसल्याने " वेळेवर वेतन मिळत नसेल तर अधिकारी किती कर्तव्यदक्ष आहेत याची प्रचिती येते.
  सध्याच्या परिस्थितीत मंत्री वेडे - पिसाळलेल्या सारखे झाले आहेत. फक्त खुर्ची साबुत राहावी यासाठी भ्रष्ट बुद्धीने राजकारण करून सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायाची श्रृंखला सुरू केली आहे. आता फक्त मंत्र्यांच्या बंगल्यावर आणि जिथे भेटतील तिथे त्यांना खेचून झोडपून काढायची वेळ आली आहे. त्यासाठी सर्वांनी संघटीत होणे महत्त्वाचे आहे.

Post a Comment

0 Comments