Advertisement

दत्तात्रय खंडू जाधव यांचे निधन

शिरूर : रांजणगाव गणपती ( ता. शिरूर ) येथील दत्तात्रय खंडू जाधव वय ( ४९ ) हे रांजणगाव गणपती येथील बसस्थानकावरून मंदिराकडे पायी चालत येत असताना त्यांना पाठीमागून टेम्पो ने धडक दिली होती. त्यांना शिरूर खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. मुलगा हर्षद जाधव यांनी या बाबत रांजणगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. 
फिर्यादी मुलगा हर्षद जाधव ( जिल्हाध्यक्ष भा.ज.पा विद्यार्थी आघाडी शिरूर लोकसभा यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांचे वडील पायी जात असताना मागून येणाऱ्या ट्रक ने धडक दिल्याने त्यांच्या वडीलांचा अपघात झाला. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.    
  रांजणगाव गणपती येथील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा हा परिवार आहे. यातील अग्रेसर असणारे व्यक्तिमत्त्व गेल्याने खरोखरच रांजणगाव आणि परिसरातील नातेवाईक, ग्रामस्थ सर्वांना मोठ दुःख झाले आहे. त्यांच्या पाठिमागे त्यांची पत्नी, २ मुले, आई, भाऊ, सुन आणि इतर सर्व असा खुप मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments