Advertisement

कोचरा आश्रम शाळेचे शिक्षक तथा बिरसा फायटर्स चे शहादा तालुका सचिव सुरज पटले यांना क्रीडारत्न जाहीर


शहराला:-कोचरा आश्रम शाळेचे शिक्षक तथा बिरसा फायटर्स चे शहादा तालुका सचिव सुरज पटले यांना नाशिक जिल्हा शिवसेना क्रीडा विभागाचे वतीने उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार जाहिर झाला आहे.
शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व क्रीड़ा विभाग जिल्हा प्रमुख अशोक दुधारे यांनी पुरस्कार निवडीचे पत्र श्री.सुरज पटले यांना दिले आहे.

शिवसेना नाशिक जिल्हा यांचे वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील ( नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार) क्रीडा शिक्षकांना 'उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न' पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहेत. यात सुरज पटले यांचा ही समावेश आहे. दि. २३ एप्रिल २०२३ रोजी सायं. ५.०० वा. सह्याद्री बिझसेन पार्क, मायको सर्कल, तिडके कॉलनी, नाशिक २ येथे मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सुरज पटले यांनी सांगितले की तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मानले

Post a Comment

0 Comments