Advertisement

पाल तालुका रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात रूग्णांन चे हाल आदिवासी तडवी भिल एकता मंच ने चौकशी करण्या चे दिले निवेदन

 जळगाव जिल्ह्यातील पाल तालुका रावेर येथील ग्रामीण रुग्णालय मधील अनागोंदी कारभार कारभाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक यांनाआदिवासी तडवी भिल एकता मंच द्वारा निवेदनाद्वारे दिले. आदिवासी भागामध्ये असलेले पाल ग्रामीण रुग्णालय येथे परिसरातील आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून येथील कर्मचाऱ्यांन कडून आदिवासी समाजातील महिलारुग्ण यांना अरेरावी केली जात असल्याची तक्रार आदिवासी एकता मंच चे तालुकाध्यक्ष सलीम दादा तडवी उर्फ सलीम नेता यांच्याकडे परिसरातील आदिवासी महिलांनी केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष रुग्णालयातील रुग्णांचे हाल बघितले महिना महिना डॉक्टर उपलब्ध नसणे, कोणीही कर्मचारी मुख्यालय न थांबणे, तसेच उपचारासाठी आलेला रुग्णांना उपचार न करणे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिये साठी आलेल्या महिलांना योग्य उपचार न करणे व त्यांची गैरसोय करणे अशा अनेक तक्रारी चा पाढा आदिवासी रुग्णांनी एकता मंच च्या पदाधिकाऱ्यां समोर रुग्णांनी सांगितला त्यानंतर जिल्हाध्यक्ष सलीम भाऊ तडवी राज्य सदस्य नशिर दादा तडवी जिल्हा सदस्य सरफराज दादा तडवी जिल्हा संघटक रब्बिल तडवी जिल्हा उपाध्यक्ष फिरोज दादा तडवी यांनी जिल्हाधिकारी साहेब तसेच जिल्हा शल्य चिकित्सक तसेच रावेर तहसीलदार यांना तात्काळ कारवाई करणे बाबत निवेदन दिले तसेच अनुसूचित जमाती आयोग व आरोग्य मंत्री तानाजी सावंत ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना कारवाई करिता पाठवली असून तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा आदिवासी एकता मंच संघटनेने दिला आहे

Post a Comment

0 Comments