Advertisement

किर्तनकार महाराज शंकर शेवाळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी बिरसा फायटर्स पुणे जिल्हा पदाधिकारी

रांजणगाव उपविभागीय पोलिस अधिकारी पुणे यांना निवेदन

पुणे:- झी युवा मराठी वाहिनीवर किर्तनकार महाराज शंकर शेवाळे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कल्याण कायदा 1969 अन्वये अंतर्गत गुन्हा दाखल करणेबाबत असी मागणी बिरसा फायटर्स पुणे जिल्हा पदाधिकारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी पीएसआय रांजणगाव पोलिस स्टेशन यांना निवेदनाद्वारे केली आहे
निवेदनात म्हटले आहे की दोन तीन दिवसांपूर्वी झी युवा मराठी वाहिनीवर किर्तनकार महाराज शंकर शेवाळे मु ओम कॉर्नर सोसायटी मंचर ता आंबेगाव जि पुणे मो नं 9860188130/9657474247 यांनी आदिवासी समाजा बदल अपशब्द वापरले आहे त्यांनी झी युवा मराठी वाहिनीवर किर्तनातून आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असे आक्षेपार्ह शब्द आदिवासी नरभक्षक आहेत आदिवासी समाज माणसे मारुन खातात असे अपशब्द एका किर्तनातून महाराज शंकर शेवाळे यांनी व्यक्त केले आहे 
तरी त्यांच्या वर अनुसूचित जाती जमाती कल्याण अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३,१५३ (अ)२९५,२९८ मुंबई पोलीस ॲक्ट नुसार १३१,१३४,१३५ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात यावे तरी वरील गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा आणि जरी असे नही झाले तर समस्त आदिवासी समाज रस्त्यावर उतरून या संबंधित महाराजांच्या निषेध व्यक्त केले जाईल याची नोंद घ्यावी म्हणून आपणास विनंती आहे की वरील विषयावर लवकरात लवकर या महाराज शंकर शेवाळे वर अनुसूचित जाती जमाती कल्याण कायदा नुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी विनंती कारवाई नही झाल्यावर बिरसा फायटर्स महा राज्य संघटना तर्फे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन बिरसा फायटर्स पुणे जिल्हा पदाधिकारी यांनी पोलिस अधिकारी यांना दिले
उपस्थित पदाधिकारी
१) गणेश खर्डे-राज्य उपाध्यक्ष
२) राहुल पावरा -सचिव पुणे जिल्हा
३) शंकरसिंग ठाकूर-पत्रकार रांजणगाव
४) सुनिल बारेला-संपर्क प्रमुख पुणे जिल्हा
५) सुरेश चव्हाण- सहसचिव पुणे जिल्हा
६) पिंटू बारेला-संघटक पुणे जिल्हा
७) मनोज पावरा- सदस्य पुणे जिल्हा 

Post a Comment

0 Comments