Advertisement

एकच पेन्शन,जुनी पेन्शन! हल्लाबोल दुष्शासनावर हल्लाबोल! घोषणांनी दापोली परिसर दणाणला!

जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे दापोलीत थाळीनाद आंदोलन
दापोली: जुनी पेन्शन योजना लागू करावी,या मागणीसाठी सरकारी कर्मचारी यांनी 14 मार्च पासून पुकारलेला बेमुदत संप सुरूच असून आज सातव्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केले.एकच पेन्शन जुनी पेन्शन, कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय,दुष्शासन पर हल्ला बोल,दमननितीपर हल्ला बोल,मनमानीपर हल्लाबोल,जोर से बोलो हल्ला बोल,पेन्शन!पेन्शन! पेन्शन!अशा घोषणांनी दापोली तहसीलदार परिसर कर्मचाऱ्यांनी घोषणांनी दणाणून सोडले.
महाराष्ट्र राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी,या मागणीसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना,सरकारी व निमसरकारी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपालिका समन्वय समिती दापोली तालुक्यातील हजारों कर्मचारी तहसीलदार कार्यालय समोर थाळीनाद आंदोलन करत आहेत.
             जुनी पेन्शन योजना लागू करावी,या मागणीसाठी आम्ही प्रशासनास अनेकदा निवेदन दिली,अनेकदा आंदोलने केली तरी यावर शासनाकडून कोणताही निर्णय होत नाही.त्यामुळे राज्यातील कर्मचा-यांचे पुढील भविष्य अंधारमय दिसत आहे. डिसेंबर 2022 मध्ये नागपूर येथील अधिवेशनात कर्मचाऱ्यांचा मोर्चा बघून मयत कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन व उपादान देण्यात येईल असे आश्वासन दिले.परंतु त्याचीही पूर्तता करण्यात आली नाही.त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत संप करत राहणार आहोत,हे आंदोलन आम्ही आणखीन उग्र करणार आहोत अशी प्रतिक्रिया समन्वय समितीचे दापोली तालुका अध्यक्ष जावेद शेख यांनी दिली आहे.जुनी पेन्शन ही जुनीच आहे,ती आमची मुख्य मागणी आहे.कोरोना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या थाळीनाद आंदोलनाने गेलेला नाही तर आमच्यासारख्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामांमुळे गेला आहे.म्हणून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जुनी पेन्शन सुरू करावी.अशी प्रतिक्रिया सिंधू मयेकर उपविभागीय सचिव महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना यांनी दिली.आम्ही या संपातून कधीच माघार घेणार नाही,लढा अधिक तीव्र करू असा इशारा सुरेंद्र महाडिक तालुका अध्यक्ष दापोली ग्रामसेवक संघटना यांनी प्रशासनास दिला आहे.
                  यावेळी विनोद जाधव तालुका अध्यक्ष दापोली तलाठी संघटना,विनायक वाळंज जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,सुमित जाधव,सुरेश पाटील, उमेश पाडवी,
विनोद पारधे सरचिटणीस, सदस्य अमोल कोंडूसकर, सुनिल येलवे,उत्तरेश्वर डोंगरे,दिपक गोरीवले,राजू कांबळे,गणेश ऐनकर,संजय गुडले, प्रशांत रामटेके,पिंगला पावरा,प्रमिला डुडवे आदी विविध विभागातील सरकारी कर्मचारी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments