Advertisement

पंचायत समिती कर्मचारी व पदाधिकारी यांच्या क्रीडा स्पर्धा उद्घाटन मोखाडा येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल येथील मैदानावर घेण्यात आल्या.

पालघर प्रतिनिधी - सौरभ कामडी 
 - मोखाड्या तालुक्यातील विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात आणि योग्य ते उपक्रम घेऊन आणि येथील स्थानिक ग्रामस्थ लोकांना तर असेच खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले जातात अशाच पद्धतीने यावेळी स्पर्धा उद्घाटन सोहळा पंचायत समिती चे सभापती श्री भास्कर थेतले, उपसभापती श्री प्रदीप वाघ, सदस्य सौ लक्ष्मी भुसारा, अनिता पाटील व गटविकास अधिकारी श्री कुलदीप जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला
यावेळी खेळाडूंना शुभेच्छा देताना श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की , रोजच्या धावपळीच्या जीवनात वाढणार्या मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी सर्वींनी खेळात सहभागी होऊन मनाची व शरीराचे स्वास्थ्य उत्तम राहील, शिवाय खेळाच्या निमित्ताने सांघिक भावना निर्माण होईल.
आपल्या जीवनात खेळ हा अविभाज्य घटक असुन,या निमित्ताने पुन्हा एकदा खेळायला सुरुवात करुन, पुढील जिल्हा स्तरावरील स्पर्धेत मोखाडा तालुक्यासाठी चांगली कामगिरी करावी अशी शुभेच्छा श्री प्रदीप वाघ यांनी दिल्या.
यावेळी सहायक गटविकास अधिकारी मा. श्री तुषार सुर्यवंशी साहेब,उप अभियंता बांधकाम श्री काळे साहेब, श्री भाऊसाहेब चत्तर तालुका वैद्यकीय अधिकारी, गटशिक्षणाधिकारी श्री अमोल जंगले साहेब.
पत्रकार श्री हनीफ शेख साहेब, श्री रविंद्र साळवे, श्री ज्ञानेश्वर पालवे, श्री सद्दाम शेख, जेष्ठ शिक्षक श्री भरत गारे सर, श्री हेमंत लहामगे इत्यादी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments