Advertisement

नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांची तिरुपती विद्यालयास सदिच्छा भेट.

*एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी:- मुख्य उपसंपादक* 
मध्यान्न पोषण आहराची चव घेऊन केला समाधान व्यक्त वडेगांव(खांबा) येथील तिरुपती विद्यालय/स्व निर्धनराव पा वाघाये कनिष्ठ कला महाविद्यालयास नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी सदिच्छा भेट देऊन शालेय मध्यान्न पोषण आहाराचा आस्वाद घेतला. वडेगांव (खांबा) ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच माधुरी गहाणे व महिला सदस्या विश्रांती भानारकर, हेमलता ऊईके यांनी आज ३० डिसेंबर रोजी दु.१.३० वा. विद्यालयास सदिच्छा भेट दिली.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आनंद राहांगडाले, शिक्षक रवींद्र कापगते,नंदकुमार क्षिरसागर, के.पी.गहाणे, ए.बीकापगते,प्रा.अनीलगहाणे,प्रा.मुन्नाजी राऊत,जे.एच.   खोब्रागडे,एन.जी.कांबळे,आर.के.भानारकर,एम.बी.    केवट व संपुर्ण शालेय कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच माधुरी गहाणे यांनी शालेय विद्यार्थ्यांशी आरोग्य संबंंधाने चरचा करून  संवाद साधून माहिती जाणून घेतली व मार्गदर्शक सुचना केल्या.यापुढे शाळेला कोणत्याही मदतीची गरज पडल्यास सर्वोतो परी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.त्यानंतर विद्यार्थ्यां सोबत मध्यान्न पोषण आहाराची चव घेऊन समाधान व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments