Advertisement

मलगाव शासकीय प्राथमिक आश्रम शाळातील मुलींनी क्रीडा स्पर्धा मध्ये सहभाग घेऊन चांगले प्रकारे उत्तीर्ण झाले

मलगाव:-आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत नंदुरबार जिल्हा प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा क्रीडा संकुल येथे जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रियाताई गावीत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तसेच प्रकल्पधिकारी सौ मीनल करनवाल सुद्धा उपस्थित होते.
तसेच मलगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील शासकीय प्राथमिक आश्रम शाळातील 14 वर्षे वयोगटातील मुलींनी सुद्धा क्रीडा स्पर्धा मध्ये सहभाग नोंदविला आहे,मलगाल गावातील शासकीय प्राथमिक आश्रम शाळातील मुलींनी स्पर्धा मध्ये लांब उडी मध्ये,रविता मगन डावरे, 3 रा क्रमांक,600 मीटर धावणे,निकिता व्यंकट पटले 3 रा क्रमांक पटकावला, तसेच थाळी फेक मध्ये सावित्री किसन खर्डे,3 रा क्रमांक पटकावला आहे या शाळेचे मुख्याध्यापक श्री काकासाहेब बोळखे,अधीक्षक श्री राहुल बोरेकर,श्री रविलाल वसावे सर, श्री रामलाल पावरा सर,अविनाश वसावे सर, सोमवेल वळवी सर,श्री फारुख कुरेशी सर,श्री विक्रम सर,श्रीमती गायकवाड मॅडम,श्री राजेश पटले दादा, श्री मुकेश पटले, श्री संजय पावरा दादा, श्री हरीचंद्र आंधळे, श्री सेंदाने या सर्वांचा मार्गदर्शन मुळे आज शासकीय प्राथमिक आश्रम शाळातील मुली क्रिडा स्पर्धा मध्ये सहभागी होवून शाळेतील नाव मोठे केल आहे

Post a Comment

0 Comments