Advertisement

जिल्ह्यात बिरसा फायटर्सच्या वतीने अनेक गावात धरतीआबा बिरसा मुंडा यांना अभिवादन

तळोदा(प्रतिनिधी) उलगुलानचे प्रणेते धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त बिरसा फायटर्सचा वतीने जिल्ह्यात अनेक गावात त्यांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.तळोदा तालुक्यात रांझणी येथे जिल्हा निरीक्षक सुभाष पाडवी,किरण पाडवी व शाखाध्यक्ष सुरेश मोरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रोझवा पुनर्वसन येथे जिल्हाध्यक्ष भरत पावरा व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.लक्कडकोट,खर्डी बु ll संयुक्तपणे कार्यक्रम झाला.यावेळी खर्डीचे उपाध्यक्ष गुलाबसिंग पाडवी, लक्कडकोटचे सचिव दिनेश वळवी डॉ,जगन पाडवी, केशव पाडवी व कार्यकर्ते उपस्थित होते.मालदा येथे ही तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, हिरामण खर्डे व टीम,गंगानगर(पुनर्वसन)शाखाध्यक्ष सायसिंग पाडवी त्यांची टीम,तुळाजा शाखाध्यक्ष प्रदीप व त्यांची टीम,बोरदला दयानंद चव्हाण, तालुका उपाध्यक्ष प्रवीण ठाकरे व टीमने कार्यक्रम घेतला.शहाद्यात वडगांव जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,शाखाध्यक्ष राहुल चव्हाण,राजू चव्हाण व टीम,कनसाई तालुका संघटक राजू ठाकरे व टीम तर नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी व टीम,धडगांव तालुका सचिव प्रदीप पावरा व टीम, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष प्रा.संपत वसावे व टीम येथील शाखेनेही धरतीआबा बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments