Advertisement

बिरसा फायटर्सच्या एका फोनने झाले काम,न्याय मिळण्यास मिळाला आधार

खूनाचा गुन्हा नोंदवण्यास पोलीस निरीक्षक तयार 


धडगांव:मयत ईश्वर सीपा वळवी कालीबेल तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार यांचा खूनाचा गुन्हा दाखल करण्यास पोलीस निरीक्षक मनमाड हे सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या एका फोनने तयार झाले आहेत.सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी बिरसा फायटर्स कडे तक्रार आल्यानंतर लगेच फोनवर मनमाड पोलीसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे.
       सागर सीपा वळवी रा.कालीबेल ता.धडगांव जि.नंदुरबार मयतचा भाऊ यांचा बिरसा फायटर्स धडगांव शाखेकडे दिनांक 11/10/2022 रोजी तक्रार अर्ज प्राप्त झाला होती.त्यानंतर लगेच सुशिलकुमार पावरा यांनी मनमाड पोलीस ठाण्यात फोन केले.तेव्हा पोलीस अंमलदार यांनी फोन उचलला.मी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स बोलत आहे,आपल्या मनमाड पोलीस ठाणे हद्दीत ईश्वर सीपा वळवी यांचा खून झाला आहे.त्याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी मयतचे नातेवाईक तुमच्या पोलीस ठाण्यात आले होते,परंतु तुम्ही गुन्हा नोंदवला नाही,एवढा मोठा गंभीर गुन्हा झाला तरी तुम्ही अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? असा प्रश्न सुशिलकुमार पावरा यांनी विचारला,त्यावर पोलीस अंमलदार म्हणाले,मला याबाबत काही कल्पना नाही.तेव्हा सुशिलकुमार पावरा यांनी सांगितले की,माझा फोन पोलीस निरीक्षक यांच्याशी जोडून द्या.त्यावर अंमलदार म्हणाले,फोन जोडता येत नाही,मी आमचे वरीष्ठ पोलीस उपनिरीक्षक यांना फोन देते.पोलीस निरीक्षक म्हणाले बोला दादा,काय तक्रार आहे,यावर पावरा म्हणाले,आपल्या मनमाड तालुक्याच्या ,पोलीस ठाणे हद्दीत ईश्वर सीपा वळवीचा खून झाला.त्यानंतर मयतचे कुटुंबीय आपल्या मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते,परंतु पोलीसांना तक्रार घेतली नाही,असा तक्रारदार यांचा पोलिसांवरच आरोप आहे.यावर पोलीस उपनिरीक्षक म्हणाले,एवढा सिरीयस गुन्हा आहे,म्हटल्यावर गुन्हा पोलीस ठाण्यात घेणारच ना,दादा.त्यावर सुशिलकुमार पावरा बोलले की,सीरियल गुन्हा असून सुद्धा नोंदवला गेला नाही,पोलीस निरीक्षक व आरोपी ठेकेदार यांच्या संगनमताने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे,असा आरोप तक्रारदार कुटुबांचा आहे.म्हणून तुम्ही पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदवा,ही आमची मागणी आहे.यावर पोलीस उपनिरीक्षक बोलले की,दादा मी आमचे पोलीस निरीक्षक गीते साहेब यांचा फोन नंबर देतो,तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या.
                    सुशिलकुमार पावरा यांनी थेट पोलीस निरीक्षक यांनाच फोन लावला व बोलले की,ईश्वर सीपा वळवी रा.कालीबेल ता.धडगांव जि.नंदुरबार यांचा मनमाड पोलीस ठाणे हद्दीत खून झाला आहे ,तरी तुम्ही खूनाचा गुन्हा का नोंदवला नाही.यावर पोलीस निरीक्षक म्हणाले की,त्याने स्वतःच फाशी घेतली आहे,तशे सी सी टिव्ही फुटेज आमच्याकडे आहेत, तेव्हा मर्डरचा गुन्हा दाखल कसा होईल, तेव्हा पावरा म्हणाले ,ईश्वर सीपा वळवी याने फाशी घेतली नाही,तर त्याचा खून करण्यात आला आहे.तो खूनाचा गुन्हा पोलीस नोंदवत नाहीत, असा पोलिसांवरच नातेवाईकांचा आरोप आहे.त्यावर पोलीस निरीक्षक बोलले की,त्याला कुठेन जबरदस्तीने आणलं तरं,धडगांव नंदुरबार हून,त्याला टार्चर कुठे करण्यात आलं,पंढरपूरला.तर मग त्याचा अपहरणाचा गुन्हा धडगांव पोलीस ठाण्यात नोंद नाही,मारहाण केल्याचा गुन्हा पंढरपूरला नोंद नाही,मग आम्ही मनमाडला खूनाचा गुन्हा कसा नोंदवू. यावर सुशिलकुमार पावरा म्हणाले,मनमाड पोलीसांना आरोपींनी पैसे देऊन हे प्रकरण खून ऐवजी आत्महत्या-फाशी म्हणून वेगळे नोंदवले आहे,नातेवाईकांचा पोलिसांवरच आरोप आहे. तेव्हा तक्रारदार येतील तेव्हा त्यांची तक्रार घ्या.ऐवढेच माझे म्हणणे आहे. यावर पोलीस निरीक्षक म्हणाले,तक्रारदार यांना पाठवून द्या,मी तक्रार घेतो.
               या प्रकरणात बिरसा फायटर्सचे धडगांव महासचिव प्रदिप पावरा व चूलवड गांवशाखेच्या पदाधिकारी यांनी धडगांव पोलीस ठाण्यात जाऊन मयतच्या नातेवाईकांना गुन्हा नोंदवण्यासाठी योग्य ते सहकार्य केली.तसेच ईश्वर सीपा वळवी यांच्या अपहरणाचा,खूनाचा,मारहाणीचा गुन्हा दाखल न केल्यास पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन करण्याचे संघटनेचे पत्र दिले.तसेच पोलीस निरीक्षक पठाण यांना सुद्धा सुशिलकुमार पावरा यांनी फोन केला तेव्हा पोलीस निरीक्षक पठाण यांनी सुद्धा त्याला अपहरण केले तेव्हाच गुन्हा नोंद करण्यात यायला पाहिजे होते,या घटनेला दोन महिने झालेत, अशी उडवा उडवीची उत्तर दिलं.परंतु नंतर बिरसा फायटर्सचा अर्ज स्वीकारला.
              15 दिवसांपासून मयत ईश्वर सीपा वळवी यांचा कुठेच गुन्ह्याची नोंद करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते,अखेर सुशिलकुमार पावरा यांच्या एका फोनने खुनाचा गुन्हा दाखल करण्यास मनमाड पोलीस तयार झाल्यामुळे नातेवाईकांना या प्रकरणात न्याय मिळण्यास मोठा आधार मिळाला आहे.तसेच बिरसा फायटर्स धडगांव टिमने धडगांव पोलीस ठाण्यात नातेवाईकांना मदत केल्यामुळे प्रकरणात न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.या प्रकरणात आमची बिरसा फायटर्स संघटना मयत व मयतचे नातेवाईक यांना न्याय मिळेपर्यंत साथ देईल, फक्त नातेवाईक यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या म्हणण्यावर ठाम राहावे,न्याय मिळेल, असे आवाहन बिरसा फायटर्सचे महासचिव प्रदिप पावरा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments