Advertisement

देशातील क्रीडा स्पर्धा आदिवासी विद्यार्थी गाजवणार- प्रदीप वाघ..


पालगर प्रतिनिधी,( सौरभ कामडी 


आज आदिवासी विकास विभागाचे वतिने जव्हार प्रकल्प अंतर्गत पळसुंडे आश्रम शाळा येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की, मागील काही काळा पासून आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी लक्षात घेता
आपल्या भारत देशाचे क्रीडा क्षेत्रात
आदिवासी विद्यार्थी, खेळाडू हेच प्रतिनिधी करतील व देशाला जागतिक पातळीवरील स्पर्धा मधुन पदके मिळवून देऊन, आपल्या समाजाचे लौकिक वाढवणार व देशा मध्ये आदिवासी खेळाडू नाव गाजवणार
असल्याचे गौरवोद्गार श्री प्रदीप वाघ यांनी काढले.
पळसुंडे येथे दिमाखदार उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला व स्पर्धा सुरवात झाली
१२ शाळेतील विद्यार्थी ‌खेळाडु मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
या कार्यक्रमा साठी अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सदस्य श्री दिलीप बोढेरे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रदीप वाघ, निलेश झुगरे, रघुनाथ पाटील, प्रदीप वारघडे, नंदकुमार वाघ,सौ कविता पाटील पोलिस पाटील., प्रकल्प कार्यालयाचे युवराज पवार,योगेश बापट, मुख्याध्यापक राठोढ सर, गुलसाड सर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश भांगरे सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments