Advertisement

🌹 आजची सभा व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार 💥 कार्यक्रमात लग्नसमारंभसारखी अफाट गर्दी,


*👊🤝बिरसा फायटर्सला गावागावांत वाढती पसंती*✊✊ 
     दिनांक 4 नोव्हेंबर 2022

*🔹बिरसा फायटर्स गांव शाखा वडगांव* 🔹
         शहादा तालुक्यातील बिरसा फायटर्स पुरस्कृत नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार समारंभ बिरसा फायटर्स  गांव शाखा वडगांव तर्फे आयोजित करण्यात आला.
        आदिवासींचे दैवत देव मोगरा माता,भगवान बिरसा मुंडा,वीर एकलव्य, डाॅ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
                या कार्यक्रमाला *सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष ,राजेंद्र पाडवी महासचिव, दयानंद चव्हाण नाशिक विभागीय प्रवक्ता, हिरालाल पावरा नाशिक विभागीय कार्याध्यक्ष , कृष्णा भंडारी जिल्हाध्यक्ष पुणे,भरत पावरा जिल्हाध्यक्ष नंदुरबार, सुभाष पावरा तालुकाध्यक्ष तळोदा,करनसिंग तडवी आदिवासी कवी,जालिंदर पावरा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, सुनिल सुळे सामाजिक कार्यकर्ते,गाव सरपंच, गाव पोलीस पाटील, बिरसा फायटर्स गांव शाखा अध्यक्ष व संपूर्ण टिम,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स  टिम,शिक्षक, डाॅक्टर, गांवातील सर्व आदिवासी बांधव* उपस्थित होते.
                नवनिर्वाचित *सरपंच व सदस्य यांचा जाहीर सत्कार शाल,श्रीफळ, पुष्प देऊन करण्यात आला*.अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स,बिरसा फायटर्स गाव शाखा टिमचा सत्कार करण्यात आला.बिरसा फायटर्स टीमचा उत्कृष्ट कार्य करित असल्याबद्दल गांवक-यांनी शाल ,श्रीफळ, पुष्प देऊन जाहीर सत्कार केला.
        प्रस्तावना जिल्हाध्यक्ष भरत पावरा यांनी केली.राजेंद्र पाडवी महासचिव यांनी बिरसा फायटर्स संघटनेचे महत्त्व पटवून दिले.दयानंद चव्हाण नाशिक विभाग प्रवक्ता यांनी बिरसा फायटर्स संघटना इतर संघटनांपेक्षा विशेष का आहे? कामगिरी जलद कशी करते? याबद्दल मार्गदर्शन केले.करनसिंग तडवी यांनी बिरसा फायटर्स तर्फे आदिवासींत गांवोगावी जागृती होत आहे.याबद्दल प्रबोधन केले.शेवटी अध्यक्षीय भाषणात सुशिलकुमार पावरा यांनी बिरसा फायटर्स संघर्षातून कशी तयार झाली? आपला संघर्ष व बिरसा फायटर्सच्या जलद कामांची माहिती दिले व आदिवासी समाजाने बिरसा फायटर्स या नावाखाली एकसंघ करण्यासाठी आवाहन केले.आयोजकांचे अभिनंदन केले व तरुणांच्या कार्याचा गौरव केला.
      आभार प्रदर्शन नंतर स्नेहभोजन झाले.लग्नसमारंभा सारखी कार्यक्रमात अफाट गर्दी जमली.
       बिरसा फायटर्सला गावागावात वाढती पसंती.
*जय बिरसा! जय आदिवासी!*

✍️ *सुशिलकुमार पावरा,राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स* 🙏

Post a Comment

0 Comments