Advertisement

बिरसा फायटर्सच्या वतीने वडगांव येथे श्रमदानातून वनराई बंधारा


शहादा(प्रतिनिधी)बिरसा फायटर्स विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.विद्यार्थ्यांसाठी 'विद्यार्थी अभ्यास संवाद उपक्रम' तसे,पाण्याची भुजल पातळी वाढविण्यासाठी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हा उपक्रम हाती घेवून वडगांव येथे बिरसा फायटर्सने श्रमदानातुन वनराई बंधारा बांधला.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा,राज्यमहासचिव राजेंद्र पाडवी,विभागीय प्रवक्ता दयानंद चव्हाण, विभागीय कार्याध्यक्ष हिरालाल पावरा,जिल्हाध्यक्ष भरत पावरा,वडगांव सरपंच,पोलीस पाटील,प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,कवी करण तडवी,पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, शाखाध्यक्ष राहुल पावरा,उपाध्यक्ष राजू पावरा सुकलाल सुळे,डॉ,सचिन सुळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments