Advertisement

वडगांव आरोग्य उपकेंद्रातील रिक्त पदे त्वरित भरा


शहादा(प्रतिनिधी)वडगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रिक्त पदे त्वरित भरावीत यासाठी बिरसा फायटर्सने आरोग्य अधिकारी सो, जि.प.नंदुरबार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,गेल्या अनेक वर्षापासून नर्स,डॉक्टर यांच्या रिक्त पदामुळे परिसरातील डेंग्यू,मलेरिया, कॉलरा,ताप,सर्दी,खोकला या साथीचा रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही.आरोग्य केंद्रात सध्या एकच डॉक्टर आहे.नाईलाजाने रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करावा लागतो.गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.त्वरित रिक्त पदे भरून परिसरातील गरीब रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी बिरसा फायटर्सने केली आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा, शाखाध्यक्ष राहुल चव्हाण,उपाध्यक्ष राजू पावरा,बिरबल पावरा,राहुल पावरा,अनिल पावरा,तुळशीराम जाधव, पवन पावरा,गोविंद चव्हाण,संतोष पावरा,विजय भिल, यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments