Advertisement

वडगांव येथे आरोग्य उपकेंद्र केंद्रातील रिक्त पदे त्वरित भरा बिरसा फायटर्स वडगाव गावा शाखा तर्फे गटविकास अधिका-यांना निवेदन

शहादा(प्रतिनिधी) वडगाव ता शहादा जि नंदुरबार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदे त्वरित भरावीत यासाठी बिरसा फायटर्सने गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी यांना निवेदनद्धोरा मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,गेल्या अनेक वर्षापासून नर्स,डॉक्टर यांच्या रिक्त पदामुळे परिसरातील डेंग्यू,मलेरिया, कॉलरा,ताप,सर्दी,खोकला या साथीचा रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही.आरोग्य केंद्रात सध्या एकच डॉक्टर आहे.नाईलाजाने रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करावा लागतो.गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.त्वरित रिक्त पदे भरून परिसरातील गरीब रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी बिरसा फायटर्सने केली आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा, शाखाध्यक्ष राहुल चव्हाण,उपाध्यक्ष राजू पावरा,बिरबल पावरा,राहुल पावरा,अनिल पावरा,कमल पावरा यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments