Advertisement

कर्जाच्या बोजामध्ये अडकून एका तरुणाने नैराश्या तुन घेतली गळफास


अजंग तालुका जिल्हा धुळे येथील समाधान संतोष माळी हा पुणे येथे कंपनीत कामाला होता परंतु तो कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने शेवटी कंटाळून आत्महत्या हा पर्याय निवडला,१०/११/२०२२ गुरुवारी त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली परिस्थिती अत्यंत गरिबीची होती,वडीलही वारलेले होते,आणि ४ बहिणीचा एकटा भाऊ होता,
समाधानच्या आत्महत्येची बातमी येताच माझं गाव माझं शिवार ग्रुप चे ॲडमिन सुभाष दादा यांनी पुणे येथील आपल्या ग्रुप चे सदस्य यांना ग्रुपद्वारे माहिती दिली,तेव्हा माझं गाव माझं शिवार ग्रुप सदस्य हे पुणे येथे कंपनीत सर्व्हिस ला आहेत घटनेची माहिती मिळताच पुणेकर सदस्य मदतीसाठी धावून आले,आणि 17000 रुपये अँब्युलन्स,रस्ता खर्च, किराणा इत्यादींसाठी पैसे जमा करून दिले,
तसेच वर्गमित्र,माझं गाव माझं शिवार ग्रुप सदस्य,गावातील नागरिक इतर सर्व.मिळून जवळपास 48300 हजार रुपये जमा केले आणि समाधान संतोष माळी यांच्या कुटुंबा ला मदत केली,कारण की समाधानची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने शक्य नही होते येवढे करणे त्यामुळे माझे गाव माझे शिवार ग्रुपचे सदस्य यांनी व इतर गावकऱ्यांनी त्या गरीब आईला फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मदत करण्यात आली . 
एकूण रक्कम जमा
14800 ॲब्युलन्स रस्ता खर्चासाठी
3500 किरणा बाजार साठी
30.000 वर्गमित्र ,स्थानिक ग्रुप सदस्य
48300 एकूण जमा झाले रक्कम
18300 खर्च
माझं गाव माझं शिवार ग्रुप चे ॲडमिन यांनी पुणेकर आणि स्थानिक सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले

Post a Comment

0 Comments