Advertisement

बिरसा मुंडा जयंती उत्सवाची जोरात तयारी

*सांस्कृतिक कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थी गुणगौरवाचे आयोजन* 

दापोली: क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव 15 नोव्हेंबर 2022 रोजी दापोलीतील कांगवई येथे होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन शांताराम जाधव माजी अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी,दीपप्रज्वलन आर.एम.दिघे गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली,कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशिलकुमार पावरा इंटरनॅशनल आयडॉल राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स , कार्यक्रमाचे वक्ते चंदू कोकतरे आदिवासी सामाजिक कार्यकर्ता हे आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून दापोलीचे तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, काळूराम वाघमारे पंचायत समिती सदस्य, अशोक पवार उपाध्यक्ष उत्सव समिती,आशा जाधव महिला अध्यक्ष उत्सव समिती हे आहेत. 
                        सकाळी 11 वाजता दीपप्रज्वलन, पुष्पमाला,उद्घाटन, सकाळी 11.30 वाजता समाज प्रबोधन, दुपारी 1 वाजता स्नेहभोजन व दुपारी 3 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवात दहावी,बारावी,पदवीधर, उच्च पदवीधर, शिष्यवृत्ती परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणा-या गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा सुद्धा गुणगौरव करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कांगवई येथे सभा घेण्यात आली.सुशिलकुमार पावरा यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला कोणत्याही राजकीय नेत्यांना म्हणजेच आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न बोलावण्याचा निर्णय आदिवासी बांधवांनी घेतला आहे.
           या बैठकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शांताराम जाधव, पंचायत समिती सदस्य काळूराम वाघमारे,चंद्रभागा पवार राज्य महिला प्रतिनिधी बिरसा फायटर्स व आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे अनेक आदिवासी कार्यकर्ते तसेच कांगवई, वेळवी कलानगर, सुकोंडी,भोंमडी,विरसई गांवातील आदिवासी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments