Advertisement

युवकांनी स्पर्धेच्या युगात स्वतःला टिकवून ठेवावे- डॉ. हेमकृष्ण कापगते


साकोली - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र नागपूर द्वारा आयोजित विभागीय युवक महोत्सव 2022 डॉ.एस राधाकृष्णन शिक्षण महाविद्यालय साकोली येथे दिनांक 2 ऑक्टोंबर 2022 ला आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ. हेमकृष्णजी कापगते माजी आमदार साकोली कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर लोकानंदजी नवखरे मुख्याध्यापक नवजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जमनापूर प्रमुख अतिथी माननीय प्रा. पी एम ठाकरे उपप्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदूर प्रमुख उपस्थिती डॉ.जे व्ही दळवे प्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदूर श्री खेमराज राऊत प्राचार्य ताराचंदजी निखाडेअध्यापक विद्यालय साकोली ,विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार मा.डॉ.सुधाकरजी इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटनिय कार्यक्रम पार पडले याप्रसंगी पाहुण्यांनी युवकांना मार्गदर्शन करताना डॉ. हेमकृष्णजी कापगते यांनी युवकांनी स्पर्धेचे युगात स्वतःला टिकवून ठेवावे . असे सांगितले.तर अध्यक्ष स्थानावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. नवखरे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अतिशय सुंदर असा व्यासपीठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने तयार करून दिले आहे असे सांगितले त्याचबरोबर इतर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले या कार्यक्रम प्रसंगी विविध स्पर्धांच्या आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये समूह नृत्य समूह गायन एकल नृत्य एकल गायन वाद विवाद स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा पोस्टर पेंटिंग शास्त्रीय गायन शास्त्रीय वादन रांगोळी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांचे परीक्षक म्हणून श्रीमती शुभांगी सोनी नागपूर श्रीमती बिना चटर्जी नागपूर श्रीमती मनीषा काशीवार साकोली श्री घनश्यामजी निखाडे सर श्री पवनजी कोसरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तर कार्यक्रमाचे संचालन रजनीआर गायधने यांनी केले आभार प्रदर्शन कु.नीता टी.टेंभरे यांनी पार पाडले यावेळी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता केंद्रप्रमुख डॉ. घोटेकर मॅडम केंद्र समन्वयक नीता टी टेंभरे मॅडम श्री राजू खरपडे जोगेश खंडारे भूपेश गुल्हाने वैशाली फुके प्रा. अश्विनी खलोडे सौ.लीलावती सुपारी श्री प्रा.गेंदलाल इंदुलकर धनपाल घरडे प्रा. दीपक मेश्राम गुलाबराव चौधरी चेतन कापगते दिगंबर झोडे राजनंदन मेश्राम पी.एम.रामटेके व यशवंतराव चव्हाण अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी पथक परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments