Advertisement

आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, सोशल मीडिया व्हाटसअप विभागाच्या विभागीय संयोजकांची गुगलवर ऑनलाईन मीटिंग सोशल मीडियाचे प्रमुख आदरणीय अनिकेतदादा म्हात्रे यांच्या अमुल्य मार्गदर्शनाखाली व संयोजक दुर्गेशभाई पांडे यांच्या सहकार्याने मोठ्या अभुतपूर्व उत्साहात संपन्न झाली.


सदर बैठकीस माझे सहकारी व सह-संयोजक, व्हाटसअप प्रभारी भाविकाताई राका, अजयदादा डिढोरे, विभागीय संयोजक गणेश खर्डे, अमित रेड्डी, गजानन चावरे यांच्या सह सर्व सहकारी उपस्थित होते. 

आजच्या बैठकीमध्ये आगामी नोव्हेंबर महिन्यात आमचे नेते आदरणीय राहुल गांधी जी यांच #BharatJodoYatra यासह  आगमन होणार आहे, जे कोणी पदाधिकारी सदर पदयात्रेला फिल्डवर काम करण्यास इच्छुक आहेत त्यांची यादी बनवून पाठवण्याची सुचना अनिकेतदादा यांनी केली. 
आज देशामध्ये भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनता, महागाई, बेरोजगारी व आर्थिक मंदीमुळे त्रस्त आहे, त्यासंबंधीची ठोस भुमिका स्विकारुन योग्य उपाययोजना न करता जनतेचं लक्ष विचलित करण्याचं काम सत्ताधारी करत आहेत. 
जे योग्य नाही कारण जनतेने यांना सत्ता ही जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी दिली आहे की आणखी त्या समस्या वाढवण्यासाठी असा विचार आज सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. 
तुम्ही पेड गोदी मीडिया मुळे एक खोटं विकसित भारताचं स्वप्न जनतेला दाखवलं पण प्रत्यक्षात कागदावर काय आहे तर बोलाचांच भात अन् बोलाचीच कढी अशी बिकट अवस्था भाजपच्या अकार्यक्षम सरकार मुळे निर्माण झाली आहे, याचं जनतेच्या मुद्यांवर संघर्ष करुन मायबाप जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आमचे नेते आदरणीय राहुल गांधी जी #BharatJodoYatra काढतं आहेत. 

सदर पदयात्रेला भारतीय जनतेचं जे निखळ प्रेम व जनसमर्थन मिळत आहे, ते खरोखरं कौतुकास्पद आहे व भाजपच्या खोट्या प्रौपेंगंड्याला जनतेने मारलेली लात आहे. 
तुम्ही कोट्यावधीं रुपये खर्च करुन किती ही फेक मार्केटिंग करा, जनतेला तुमचं खरं स्वरुप आज कळून चुकलं आहे म्हणूनचं तर आज #भारत_जोड़ो_यात्रा याला मोठ्या प्रमाणावर यश मिळतं आहे जे बघून मोदी-शाह भाजपसोबत सर्वं घाबरले आहेत. 
काॅंग्रेस व गांधी परिवारावर चिखलफेक करण्याची भाजप संघाची जुनीच खोडं आहे पण आता तुमचे अजेंडे उघडे पडत आहेत म्हणूनचं भारत जोड़ो यात्रेला काहीचं तोड़ नाही. 
जनता आता तुमच्या खोट्या व दिशाभुल करणा-या अपप्रचाराला बळी पडणार नाही. 

आजच्या बैठकीमध्ये मोदी सरकारचं अपयश, चुकीची धोरणं व नीतिमुळे देश बर्बाद झालाय, याविषयाबरोबरचं काॅंग्रेसचं देशाच्या जडणघडणीत असलेलं बहुमोल योगदान व कार्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याविषयी सविस्तर चर्चा झाली.

Post a Comment

0 Comments