Advertisement

बिरसा फायटर्स गाव शाखा वडगाव टिम तर्फे वनदावेधाराना ७/१२ उतारा मिळणे व प्रलंबित वनदावे निकाली काढण्यात यावे म्हणून मा, प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

शहादा:आज रोजी बिरसा फायटर्स गाव शाखा वडगाव तर्फे मा, प्रांत अधिकारी कार्यालय शहादा यांना निवेदन देण्यात आले निवेदन मध्ये म्हटलं आहे की जिल्ह्यातील मंजूर वनदावेदारांना ७/१२ उतारा मिळणे प्रलंबित वनदावे निकाली काढण्यात व अद्याप ही महसुली न झाल्याने गावांना महसुली दर्जा मिळण्यात यावे कारण की गेल्या ७०/७५ वर्षांपासून आदिवासी समाज आपली वडिलोपार्जित वनजमिनींचा उदरनिर्वाहासाठी कसत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी शेतकरी सतत मागणी करत आहे अनेक मंजुर वनपटा धारक शेतकऱ्यांना गेल्या ६/७ वर्षांपासून तावा पावत्या मिळाले आहेत परंतु ७/१२ उतारा अद्याप ही न मिळाल्यामुळे शासनाच्या योजना व बॅंकेच्या पीक कर्जापासून वंचित राहावे लागत आहे अद्याप ही हजारो वनदावे प्रलंबित आहेत ती वनदावे लवकरात लवकर निकाल काढण्यात यावे स्वतंत्राचा ७५ वर्षांनंतर ही जिल्ह्यातील शेकडो गावांना महसुली दर्जा मिळाला नाही शहादा तालुक्यातील गावे आहेत
मलगाव,भुलाणे,चांदसैली,दुधखेडा, वडगाव,तितरी,मानमोडे, लंगडी भवानी,वाघडे,नवानगर,राणीपुर,शहाणे,अशी अनेक गावे आहेत हिच परिस्थिती धडगाव, अक्कलकुवा,शहादा, तालुक्यात आहेत आज ही महसुली दर्जाची प्रतीक्षा आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षे साजरा करीत असताना आदिवासी समाज आज ही उपेक्षितांच्या जीवन जगत आहेत आज ही अनेक आदिवासी पाड्यात पाण्याची,विजेची, आरोग्य, शिक्षण,रस्ते,या मुलभूत सुविधा नाहीत वर्षानुवर्षे सरकार प्रशासन दुर्लक्ष करत आहेत तरी वरील प्रश्नांची समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावे असे निवेदन बिरसा फायटर्स गाव शाखा अध्यक्ष राहुल पावरा व बिरसा फायटर्स टिम यांनी दिले
उपस्थित सदस्य

नंदुरबार जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जालिंदर पावरा,वडगाव गाव शाखाध्यक्ष राहुल पावरा, तालुकाध्यक्ष संदीप रावताळे, संपर्क प्रमुख प्रेमसिंग भोसले, राहुल चव्हाण,बिरबल पावरा, पवन सुळे,माजी सरपंच रमेश जाधव, तुळशीराम जाधव, कृष्णा सोनवणे

Post a Comment

0 Comments