Advertisement

मा,अनिल भाऊ खर्डे यांची बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा सदस्य पदी निवड झाली

मलगाव: आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ,आत्मसन्मानासाठी ,अस्तित्व ,अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त शिक्षण संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व आक्रमक संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा फायटर्स या आक्रमक संघटनेची निर्मिती झाली आहे.

अनिल खर्डे यांची निवड करण्यासाठी एका कॉल कॉफ्रेंस वरुन वरीष्ठ पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष गणेश खर्डे यांनी संवाद साधला
बिरसा फायटर्स संघटनेचे *संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा सुशिलकुमार पावरा सर*  व राज्य कमिटी जिल्हा व तालुका कमिटी पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज १ ऑक्टोबर २०२२ रोजी बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा सदस्यपदी 
*मा अनिल भाऊ खर्डे* यांची नियुक्ती करण्यात आली आहे अनिल खर्डे यांनी सांगितले की मला आदिवासी समाजाच्या अस्तित्व अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिक्षण संस्कृती परंपरा समस्या सोडविण्यासाठी माझ्याकडून सोडविण्याचा प्रयत्न करले असे आश्वासन दिले आहे
उपस्थित
राज्याध्यक्ष मनोज पावरा  राज्य राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे राज्य सचिव संजय दळवी राज्य महासचिव राजेंद्र पाडवी राज्य उपाध्यक्ष राजेश दुर्वे राज्य प्रसिध्दी प्रमुख हसन तडवी राज्य महानिरीक्षक व कोषाध्यक्ष दादाजी बागुल नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा जिल्हाध्यक्ष भरत पावरा प्रसिद्ध प्रमुख जालिंदर पावरा नंदुरबार जिल्हा सदस्य संतोष वळवी नंदुरबार जिल्हा सदस्य राहुल पावरा तालुकाध्यक्ष संदीप रावताळे असे पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments