Advertisement

विश्व मानव रुहानी केंद्र पिंपळनेर सेंटर शहादा व सेंटर मोहिदा यांच्यामार्फत 374 रुग्णांची मोफत तपासणी


विश्व मानव रूहानी केंद्र नवानगर, ( रजी.) हरियाणा व 
विश्व मानव रुहानी केंद्र पिंपळनेर तर्फे सेंटर शहादा व मोहिदा दि.३ व ४ ऑक्टबर रोजी मोफत सर्व रोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये
मा. मोहिदा येथे 237 व अनरद बारी शहादा येथे 137 अशा एकूण 374 रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले. रुग्ण व रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना लंगरचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले होते. शिबिराच्या ठिकाणी डॉक्टर परेश पाटील सर व डॉक्टर भगवान चौधरी सर या दोघांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन व अयोग्य असा सल्ला दिला. शिबिर यशस्वी करण्यासाठी सेंटर अनरद बारी शहादा, व सेंटर मा. मोहिदा येथील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments