Advertisement

आदिवासी कोळी व कोळी हृदय सम्राट,

👉 आमदार मा.रमेशदादा पाटील यांचा एक खडतर यशस्वी प्रवास

नागपूर/ चक्रधर मेश्राम. दि.१६/९/२०२२
       माणूस कोठे पोहोचला, यापेक्षाही तो कुठून कुठे पोहोचला, यावरून त्याला यशस्वी ठरवले जाते. असे विचारवंताने म्हटले होते. राजाचा पुत्र जन्मतःच राजपुत्र बनतो आणि नंतर तो राजा बनतो. एखादा दिल्लीत एका तासात पोहचतो कारण तो जवळच आग्राला राहतो. परंतु अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जन्म घेणारा जेव्हा कोळी समाजाच्या विकासाची वाट चालू लागतो, तेव्हा तो दिल्लीत पोहोचला की नाही यापेक्षा तो कोठे पोहोचला यावरून त्याच्या यश-अपयशाचे मोजमाप केले जाते. मा. रमेशदादा पाटील यांचा जन्म अत्यंत गरिब कोळी कुटूंबात झाला.गावी,तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, शिक्षण झाले. सध्या उद्योगपती म्हणून ओळख निर्माण करून घेतली. 
    चांगली नोकरी व उद्योग करून सुखाचा संसार थाटला असता परंतु तो सोडून समाजकार्यासाठी - सुलभ भावनेचा त्याग करून समाजाचा संसार थाटण्याचा निर्धार आमदार मा. रमेशदादा पाटील आणि अँड.चेतनदादा पाटील करीत आहेत. 
      - समाजासमोर तशी शपथ घेतली व समाजाचा विकास करण्याचा विडा उचलला आणि एक खडतर प्रवासाचा आरंभ गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू केला आणि आजही ती वाट मा.आमदार रमेशदादा पाटील व कुटुंबीय त्याच उत्सहाने चालत आहे. 
       मुंबई आंदोलनाचा तो दिवस आज मलाही आठवत आहे जसा काही काल घडल्यासारखा आठवतो. आझाद मैदान येथे कोळी महासंघातर्फे आयोजित केलेले ऐतिहासिक "देता की जाता" आंदोलन राजसत्ता बदलणारे ठरले. त्याचे साक्षीदार तुम्ही-आम्ही व राज्याचे मंत्री महोदय ठरलेत. समाजाचा नेता असावा तर मा रमेशदादा पाटील सारखाच..... 
      मंत्रालयामध्ये कधीच स्वतःच्या कामासाठी मा रमेशदादा आणि अँड.चेतनदादा आले नाहीत. तर ते सतत समाजाचा प्रश्न घेऊन जातात. असे समाजोपयोगी कोणत्याच समाजाचे नेतृत्व पाहिलेले नाही.
ते स्वतःसाठी काहीच मागत नाही. जे काही मागायचे ते समाजासाठी. खरच तळमळीचा नेता असावा तर फक्त रमेशदादा पाटील सारखाच ....
. मा रमेशदादा पाटील यांचा प्रवास, त्यांच्या चळवळी बद्दल,विचाराबद्दल तसेच त्यांच्या कार्यशैलीबद्दल आणि स्वभावाबद्दल बोलण्यासारखे-लिहण्यासारखे बरेच काही आहे . मा. रमेशदादा पाटील एक महासागर आहेत ,त्यातून एक घागर समोर काढून ठेवली तरी संपूर्ण मा. रमेशदादा पाटील समजू शकतात. मा. रमेशदादा पाटील आता आमदार झालेत -- खासदार, मंत्री बनले नाहीत. तरीही समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी वारंवार मांडून न्याय मिळवून देणारे समाजातील एकमेव नेतृत्व ठरले "समाजासाठीच" त्यांनी जिवन सर्वस्वाचा त्याग केला. त्या मा रमेशदादा पाटील यांच्यामागे सच्चा मावळा असल्याचा अनेकांना अभिमान वाटतो. 
       शिकला, नोकरी केली, बंगला बांधला, पैसा कमविला, चांगला संसार केला यात वैयक्तीक यश नक्कीच आहे. डॉक्टर, वकील, इंजीनिअर, प्राध्यापक,मोठे अधिकारी बनतात यातही वैयक्तीक यश नक्कीच आहे. एनजीओ काढली, शाळा बांधली,संस्था उभारल्या यातही वैयक्तीक यश नक्कीच आहे. प्रस्थापित राजकीय पक्षातून आमदार - खासदार - मंत्री बनतात यातही वैयक्तीक यश नक्कीच आहे. परंतु राज्यात सर्वात मोठ तिजोरी मुंबई, आणि सर्वात मोठी पावर ज्याठिकाणी आहे अशा "संसदभवन"- दिल्लीला लक्ष केंद्रीत करून "कोळी महासंघ" निर्माण करण्यापर्यंत महाराष्ट्रातच नव्हे तर विवीध राज्यात मा रमेशदादा पाटील यांना मानणारा, कोठे छोटा - कोठे मोठा वर्ग तयार झाला आहे. मा रमेदादा पाटील यांची समाजाला प्रजा ते राजापद बनवण्याची अशी वाटचाल चालू आहे. कोंबडा आरवला नाही तरी सुर्य उगवायचा थांबत नाही आणि थांबणारही नाही. 
   मा रमेशदादा पाटील समाजात एक नंबरवर आहेत, महाराष्ट्रातच समाजात एक नंबरवर आहेत. नेतृत्वाच्या तुलनेत मा रमेशदादा पाटील यांच्या आसपासही महाराष्ट्रातच नव्हे तर देशभारात कोणी कोळी नेता दिसत नाही. प्रस्थापित संघटनेचे काही नेते आपले आणि आपल्या समाजाचे स्थान शोधत असताना मा रमेशदादा पाटील यांनी आपला "कोळी महासंघ" स्थापन करून केवळ कोळीच नव्हे तर तमाम उपेक्षित, दुर्लक्षित, दलित मागास समाजासाठी आदर्श निर्माण केला. "कोळी समाजाला राष्ट्रीय समाजाचा प्रमुख राजकीय सत्ता" नसतांनाही अशक्य वाटावे असे ध्येय त्यांनी उराशी बाळगले आहे. न थकता, मोठ्या चिकाटीने त्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा आटोकाट प्रयत्न मा रमेशदादा पाटील करीत आहेत. का, कसे, कोणी, असे-तसे प्रश्न विचारत असतांना त्यांच्या या वाटचालीत थोडा वाटा उचलू शकलो तर मा रमेशदादा पाटील यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे. 
    आधुनिक युगातील महाभारताचे चक्रव्यूह भेदू पाहणा-या या नव अभिमन्यूला साथ दिली पाहिजे.
  राजपुत्र ते राजा असा मा रमेशदादा पाटील यांचा प्रवास नसून तो "सामान्य कुटुंब ते समाज भुषण" असा आहे. त्यामुळे यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही,मा.रमेशदादा पाटील यांच्या सारखे फक्त आणि फक्त तेच आहेत, दुसरा कोणीही नाही. 
    "आमदार मा रमेशदादा पाटील" आपल्या ध्येया पर्यंत लवकरात लवकर पोहोचो, हिच त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक लाख-लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Post a Comment

0 Comments