Advertisement

गडकरींनी:भारत जोडो यात्रा ला समर्थन द्यावं!ज्ञानेश वाकुडकर

एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ ( भारत सरकार मान्य)
भंडारा(१०आँगष्ट)
कुणी कितीही आपटली तरी आरएसएस आणि भाजपाचा (जनसंघ) खरा इतिहास स्वातंत्र्य विरोधी, देशविरोधी, मानवता विरोधी आहे. आणि तो कधीही पुसला जाऊ शकत नाही.द्वेषाच्या राजकारणाला मोदींनी शिखरावर नेऊन ठेवलं. नरसंहार, जाळपोळ, दंगल हा अलिकडे पराक्रम, अभिमानाचा, गौरवाचा विषय झाला आहे. यातही मोदी यांचा सिंहाचा वाटा आहे. 

• चुका होऊ शकतात. त्या सुधारल्याही जाऊ शकतात. आपल्या चुका मान्य करून दुरूस्त करणाऱ्या लोकांना समाजही योग्य सन्मान देत असतो. मुळात मोदी, शहा, संघ किंवा योगी यांना वाटतो तेवढा समाज कधीही खुनशी नसतो. त्यातले मूठभर लोक तसे असतात. 
• आपला बीभत्सपणा झाकण्यासाठी संघ/भाजपा बाजपेयी, महाजन सारखे मुखवटे पुढे करत असतो. पण त्यांचा अस्सल चेहरा अडवाणी, मोदी, शहा, योगी हेच आहेत. 

• मात्र अलिकडे नितिन गडकरी सारखा एखादा नेता ’मोदीशाही’ विरोधात सूचक शेरेबाजी करतांना दिसतो. बाकी नेत्यांच्या शेपट्या मोदींनी आधीच छाटून टाकल्या आहेत.
• आज गडकरी यांच्या हातात फक्त एक मंत्रालय शिल्लक आहे. ते कुठल्याही क्षणी जाऊ शकते. २०२४ला त्यांना तिकीट देतील याचीही शंका आहे. राजकीय एन्काऊंटर केल्याशिवाय त्यांचे पक्षांतर्गत विरोधक शांत बसणार नाहीत. 

• ’मी एकवेळ विहिरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही’ असं गडकरी म्हणाल्याचे आठवते. अर्थात् काँग्रेस किती वाईट आहे, यापेक्षा गडकरी संघ-भाजपचे कसे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, एवढाच त्याचा अर्थ होतो. पण संघ-भाजपाचा इतिहास पाहता त्यांच्याशी एकनिष्ठ असणं हा कोणत्याही सभ्य माणसाच्या अभिमानाचा विषय होऊ शकतो का? त्यांच्या तुलनेत काँग्रेसचा इतिहास लाख पटीने गौरवास्पद आहे! हे गडकरींना कळत नसेल का? आणि तरीही ते थातुर मातुर डायलॉग मारून, ’मी मोदी-भाजपाच्या पापात सहभागी नाही हो..!’ असं दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतील, तर त्यातून काय निष्पन्न होणार? (’नुकीले काटे चुभते है, धरा समतल होनी चाहिए’ बाबरी मस्जिद गिरावो.. संदर्भात अटल बिहारी वाजपेयी यांनी असं वक्तव्य केलं होतं. हा बाजपेयींचा खरा चेहरा आहे.)
• अशावेळी गडकरींनी विचार करण्याची गरज आहे. तशीही त्यांची राजकीय कत्तल होणार, हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. मात्र परिस्थितीने त्यांना खालील संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. 

१) राहूल गांधी यांच्या ’भारत जोडो’ पदयात्रेला समर्थन जाहीर करावं. (तशीही ती पदयात्रा पक्षीय पातळीवर नाही. इतरांचाही पाठींबा आहेच.)  
२) मंत्रिपदाचा त्वरित राजीनामा द्यावा. आणि राहूल गांधी सोबत यात्रेत सामील व्हावं. 
३) मंत्रिपदाचा राजीनामा न देता, इतर विवेकी खासदारांना सोबत घ्यावं. सर्वांनी यात्रेला जाहीर पाठिंबा द्यावा. 

(ही मोदी सरकारच्या विसर्जनाची ऐतिहासिक सुरुवात असेल. देशाला एका अराजकातून बाहेर काढण्यासाठी हातभार लावल्याचा इतिहास गडकरींच्या नावाने लिहिला जाईल.. आणि तो कुणालाही बदलता येणार नाही! रस्ते, उड्डाणपूल यांची नावं कुणीही बाजारबुणगा सत्तेच्या जोरावर बदलू शकतो)

सध्या, गडकरींच्या मनात मोठं वादळ घोंघावत आहे, यात संशय नाही! बघू या.. गडकरी हिम्मत दाखवतात का? किंवा आणखी काही वेगळे निर्णय घेतात का?

मात्र.. पदयात्रेमुळे नवा इतिहास घडणार यात शंका नाही! आगे आगे देखो होता है क्या?

तूर्तास एवढंच..!
-
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष,
लोकजागर 9822278988
•••
• ’लोकजागर’ मिशन समजून घेण्यासाठी 'समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत' हे पुस्तक वाचा. इतरांना भेट द्या. पुस्तकांसाठी संपर्क - 9503144234 (पता आणि पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट व्हॉट्स ॲप करण्यासाठी)
• फोन पे साठी - 9822278988 
• किंमत - २८० + ३० पोस्टेज = ३१० मध्ये घरपोच
•••(टीप )- माझा सोशल मिडीयावरील कोणताही लेख/कविता/साहित्य सामाजिक हेतूनं (व्यावसायिक उपयोग वगळून) अर्थातच.. माझ्या नावाने.. सोशल मीडिया किंवा अन्यत्र प्रकाशित करण्यासाठी, शेअर करण्यासाठी खुली परवानगी आहे. वेगळ्या परवानगीची गरज नाही. 
•••संपर्क - लोकजागर अभियान ( यात सर्व लेखकाचे मत आहे  या ( लेखाशी संपादक वा प्रतिनिधी जबाबदार नाही) 
• 8275570835 • 8605166191• 9422154759 • 9773436385 • 8806385704 • 9960014116

Post a Comment

0 Comments