Advertisement

मंत्री विजयकुमार गावित यांचे भ्रष्टाचार घोटाळा प्रकरण दाबण्यासाठी लाचेची ऑफर

*दाज्या पावरा पंचायत समिती सदस्य तळोदा यांच्या विरोधात तक्रार* 

*लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपीला अटक करण्याची मागणी*

नंदूरबार:6000 कोटी भ्रष्टाचार घोटाळ्यात दोषी ठरलेल्या विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास मंत्री पद दिल्यास बिरसा फायटर्स राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनाला दिला आहे.या मागणीचे निवेदन सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्यासह राज्यातील 30 जिल्ह्यातून बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवली.या प्रकरणात मंत्री विजयकुमार गावित यांना अटक होणारच, असा सुशिलकुमार पावरा यांचा विडीओ प्रचंड वायरल झाला. सोशल मिडीयावरील बातम्या व विडीओ बघून प्रकरणातील दोषी कंत्राटदार यांचे दाबे दणाणले.
          हे प्रकरण दाबण्यासाठी अनेक व्यक्तींनी सुशिलकुमार पावरा यांना फोन करत आहेत व मंत्री विजयकुमार गावित यांची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत.वारंवार फोन करूनही सुशिलकुमार पावरा हे मंत्री विजयकुमार गावित यांची तक्रार मागे घेत नाहीत,हे समजताच अनेक दलाल प्रकरण दाबण्यासाठी पुढे येत आहेत. सुशिलकुमार पावरा यांनी सदर दबाव आणणा-या व्यक्तीस ग्रुप मधून बाहेर काढले आहे.
           हे प्रकरण दाबले जाणार नाही,याची खात्री पटल्यानंतर दाज्या पावरा पंचायत समिती तळोदा भाजपा सदस्य यांनी चक्क पाॅकेट म्हणजे पैसे देऊन विषय मिटवून टाकण्याची भाषा केली आहे.भगवान बिरसा मुंडा ग्रुप वर विजयकुमार गावित यांच्या 6000 कोटी भ्रष्टाचार प्रकरणावर चर्चा सुरू असताना दाज्या पावरा यांनी पाॅकेट पाहिजे का? पाॅकेट आम्ही इतरांसारखे देतो ,पण विजयकुमार गावित यांच्या भ्रष्टाचाराबाबत खाजखाज करू नका.अशी पोस्ट टाकली.त्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रकरण दाबण्यासाठी दाज्या पावरा हे लाच देण्याची भाषा करत आहेत, हे ग्रुप वरील सदस्यांना माहित पडले.
            लाच देऊ करणा-या दाज्या पावरा भाजपा सदस्य ,पंचायत समिती सदस्य तळोदा यांची आपण लाच लुचपत प्रतिबंधक ऑफीसला तक्रार देत असल्याची माहिती सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिली आहे.दाज्या पावरा यांचे पंचायत समिती सदस्यत्व रद्द लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार रद्द करण्याची मागणी करणार आहोत, तसेच अशा भ्रष्टाचार घोटाळ्याचे प्रकरण दाखवण्यासाठी पैशांची भाषा करणा-या आरोपीला अटक करण्यात यावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे.
            या प्रकरणात एक एक कंत्राटदार व दोषी लोकांची नावे समोर येत असल्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे.या प्रकरणात बिरसा फायटर्स संघटनेने राज्यभर आंदोलन पुकारले आहे,त्यामुळे कितीही दबाव आला तरी आम्ही तक्रार मागे घेणार नाहीत, अशी माहिती सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिली करोडोंचा भ्रष्टाचार केलेले आदिवासी विकास विभाग हेच खाते विजयकुमार गावित यांना देण्यात आल्यामुळे आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments