Advertisement

जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्र्वगामी   पञकार संघ 
भंडारा : जागतिक आदिवासी दिनानिमित्त तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा कार्यालयाच्या वतीने 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ११:३० वाजता भंडारा शहरातील नागपूर रोडवरील मंगलम सभागृह येथे आदिवासी दिन तथा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार मून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, रवींद्र राठोड, भंडारा तहसीलदार अरविंद हिंगे यांच्यासह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडाराचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आयोजित जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा कार्यालयाच्या वतीने आश्रम शाळेतील विद्यार्थींसाठी नृत्य स्पर्धा होणार आहेत. यासोबतच जिल्ह्यातील आश्रम शाळेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव तसेच पालकांनी अधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भंडाराचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments