Advertisement

कोळगाव थडी - आमदार आशुतोष काळे यांचा वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा

कोळगाव थडी - आमदार अशुतोष काळे यांचा वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा 

कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस तालुक्यात मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असून  याच अनुषंगाने आज सकाळी कोळगाव थडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने झाडे लावा देश वाचवा हा उपक्रम हाती घेत  बहुसंख्य झाडे लावले असून या उपक्रमाची कोळगावथडी व पंचक्रोशीत चांगली चर्चा होत आहेत!याप्रसंगी उपसरपंच सुनील चव्हाण यांनी सांगितले की हा उपक्रम तालुक्याचे भाग्यविधाते आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मिळून राबवत असून तालुक्यातील समाज बांधवांना संदेश देऊ इच्छितो की झाडे लावल्यामुळे पर्यावरणाचा त्रास न होता पर्यावरणाची परिस्थिती समतोल राहील व झाडांमुळे पशुपक्षी तसेच शेतकरी यांचे संवर्धन होईल,तर राष्ट्रवादीचे  कार्यकर्ते संतोष लुटे हे म्हणाले की आम्ही महर्षी शंकरराव काळे -अशोक दादा काळे यांचा वारसा जोपासणारे कार्यकर्ते आहोत महर्षी शंकररावजी काळे हे निसर्ग प्रेमी व पर्यावरणाचे संरक्षण करणारे होते,त्यांनी आपल्या कारकीर्दीतून अनेकदा पर्यावरणाच्या संतुलनासाठी  वृक्ष लागवड हे उपक्रम हाती घेतले होते तर अशोक दादा काळे
 यांनी देखील शेतकऱ्याच्या हितासाठी बहुतेकदा तालुक्यात कार्यकर्ते शाळा लहान मुले यांच्या माध्यमातून झाडे लावा देश वाचवा असे उपक्रम राबवले आहेत म्हणून त्यांच्या विचाराचा हा वारसा आम्ही पुढे घेऊन चालणार आहोत याच अनुषंगाने आज या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून आम्ही कोळगाव थडी व  तालुक्यातील जनतेला एक प्रेरणादायी संदेश दिला आहे असे वक्तव्य संतोषजी लुटे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
याप्रसंगी सरपंच मीनल गवळी, उपसरपंच सुनील चव्हाण, कोळगाव थडी सोसायटी चेअरमन सोमनाथ चव्हाण, चद्रशेखर गवळी,हनुमान गवळी,मंगेश औताडे, ज्येष्ठ बाबुराव निंबाळकर,गुलाब निंबाळकर,पुंजाजी लुटे,वाळू चव्हाण, बाळासाहेब निंबाळकर,भिकन निंबाळकर,शितोळे,भाऊसाहेब लुटे,राजेंद्र लुटे,राजेंद्र निंबाळकर,नंदकिशोर निंबाळकर,विलास निंबाळकर,मोहनराव गायकवाड,दिनकर वाकचौरे,कैलास लुटे,निवृत्ती वाकचौरे,बाळासाहेब चव्हाण,गोरख कोळपे, हुसेन शेख,सुनील कुलकर्णी,
,अप्पासाहेब काकड, आदी पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments