Advertisement

सिन्नर - जिल्हा परिषद पंचायत समिती अनुसूचित जमाती या जागेवर एकलव्य आदिवासी परिषद संघटना जागा लढणार!


-आज आदिवासी भिल्ल समाज हा सिन्नर तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने असून अद्याप या समाजाला राजकीय सामाजिक तसेच विविध क्षेत्रातून डावले जाते म्हणून एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य हे संघटन महाराष्ट्रात कमी काळात अवघ्या 25 ते ३० तालुक्यांमध्ये पसरले असून जिथे जिथे अन्याय अत्याचार हक्काधिकार न्यायिक प्रश्न निर्माण होईल तिथे एकलव्य आदिवासी परिषदेचे हजारो कार्यकर्ते रणांगणामध्ये उतरत असतात, मग राजकीय क्षेत्रामध्ये आदिवासींनी का मागे राहावे! असा सवालच मंगेश औताडे यांनी माध्यमांशी केलेला आहे! आज पर्यंत विविध पक्षांना पाठिंबा देत आदिवासींची सामाजिक कामे झाली नाही म्हणून संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांच्या आदेशानुसार सिन्नर तालुक्यामध्ये एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य जिथे जिथे आदिवासींसाठी आरक्षण सोडत झालेली आहे तिथे जागा लढणार असा निर्धारक संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांनी दिला आहे असे संघटनेचे तालुका अध्यक्ष सागर वाघ यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले-

सागर वाघ - तालुका अध्यक्ष एकलव्य आदिवासी परिषद (सिन्नर)

Post a Comment

0 Comments