Advertisement

कोपरगाव - जिल्हा परिषद,पंचायत समिती जागेवर एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य सर्व जागा लढवणार

-आज आदिवासी भिल्ल समाज हा कोपरगाव तालुक्या मध्ये मोठ्या संख्येने असून अद्याप या समाजाला राजकीय सामाजिक तसेच विविध क्षेत्रातून डावले जाते म्हणून एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य हे संघटन महाराष्ट्रात कमी काळात अवघ्या २५ ते ३० तालुक्यांमध्ये पसरले असून जिथे जिथे कोणत्याही समाजावर अन्याय अत्याचार हक्काधिकार न्यायिक प्रश्न निर्माण होईल तिथे एकलव्य आदिवासी परिषदेचे हजारो कार्यकर्ते रणांगणामध्ये उतरत असतात, मग राजकीय क्षेत्रामध्ये आदिवासींनी व इतर वंचित घटकांनी का मागे राहावे! असा सवालच मंगेश औताडे यांनी माध्यमांशी बोलताना केलेला आहे! आज पर्यंत विविध पक्षांना पाठिंबा देत आदिवासी वंचित बहुजन समाज बांधव यांची सामाजिक कामे झाली नाही, तसेच तालुक्यात भिल्ल समाज हा देखील ७५ हजार एवढा असून अद्याप आदिवासी समाज बांधवांचे दैवत एकलव्य यांचा पुतळा आजवर बांधण्यात आला नाही! याची सर्वत्र आदिवासी समाज बांधवांन मधे चर्चा होत आहे! म्हणून संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांच्या आदेशानुसार कोपरगाव तालुक्यामध्ये एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य जिथे जिथे आदिवासींसाठी तसेच वंचित घटकांसाठी आरक्षण सोडत झालेली आहे तसेच इतर जागेवरही जागा लढणार असा आदेश कोपरगाव तालुक्यातील पदाधिकारी यांना आज स्वतः संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांनी दिला आहे असे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण भाऊ गांगुर्डे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले-

Post a Comment

0 Comments