Advertisement

*सुशिलकुमार पावरा यांना धमकी,मंत्री विजयकुमार गावीत यांची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव*

*मंत्री भाजपाचा व कंत्राटदार काँग्रेसचा असल्याने खळबळ*  

एसके जी पंधरे उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्युज 
राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ( भारत सरकार मान्यता

भंडारा ( भहाराष्ट्र -१६ आँगष्ट)  नंदूरबार:भ्रष्टाचार घोटाळ्यात दोषी ठरलेल्याविजयकुमार गावित यांना आदिवासी विकास मंत्री पद दिल्यास बिरसा फायटर्स राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनाला दिला आहे.या मागणीचे निवेदन सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्यासह राज्यातील 30 जिल्ह्यातून बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवली. या प्रकरणात मंत्री विजयकुमार गावित यांना अटक होणार असा सुशिलकुमार पावरा यांचा विडीओ प्रचंड वायरल झाला.सोशल मिडीयावरील बातम्या व विडीओ बघून प्रकरणातील दोषी कंत्राटदार यांचे दाबे दणाणले.आहेत
          हे प्रकरण दाबण्यासाठी अनेक व्यक्तींनी सुशिल कुमार पावरा यांना दिनांक 14 ऑगस्ट ला फोन केला व मंत्री विजयकुमार गावित यांची तक्रार मागे घेण्या साठी दबाव आणला.वारंवार फोन करूनही सुशिलकुमार पावरा हे मंत्री विजयकुमार गावित यांची तक्रार मागे घेणार नाहीत, म्हणून विजयकुमार गावित यांची रीतसर शासना कडे तक्रार करावी,बातम्यांद्वारे विजयकुमार गावित यांची बदनामी होत आहे,यामुळेच विजयकुमार गावित यांचे नाव जनमानसात खराब होतआहे, मंत्री सोबत कंत्राटदारांना अटक होऊन गावाचे नाव खराब होऊ शकते,म्हणून मंत्री विजयकुमार गावित यांच्या विरोधातले रडगाडे व  म्हणने थांबवा,अशा प्रकारची धमकी व दबाव एका वाॅटसप ग्रुप वर देण्यात आला आहे.सुशिलकुमार पावरा यांनी सदर दबाव आणणा-या व्यक्तीस ग्रुप मधून बाहेर काढले आहे.
      दबाव आणणारा व्यक्ती काँग्रेस पक्षाचा असल्याने या प्रकरणात खळबळ माजली आले.विजयकुमार गावीत यांनी सन 2004 ते 2009 मध्ये काँग्रेस व राष्ट्र वादीचे सरकार असताना हा भ्रष्टाचार केला असल्याचे उघडकीस आले आहे हेच विजयकुमार गावीत भाजपा वासी झाल्याने आदिवासीना गुंगारा देवून समाजाची फसवेगिरी करीत आहेत असा घनाघात विदर्भातील पञकार पुढारी व बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांनी जनांदोलनासाठी बिरसा फायटर्स पुढे येईल.असेही एका संदेशात म्हटले आहेत विजयकुमार भाजपा पक्षाचे मंत्री आहेत.भाजपाच्या मंत्र्याला वाचवायला काँग्रेसचे कंत्राटदार पुढे सरसावल्याने यांचे दागेधोरे कशे काय?असा सवाल करत राज्यात खळबळ माजली आहे.या प्रकरणात बिरसा फायटर्स संघटनेने राज्यभर आंदोलन पुकारले आहे,त्यामुळे कितीही दबाव आला तरी आम्ही तक्रार मागे घेणार नाहीत, अशी माहिती सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिली आहे.
                 या प्रकरणी सुशिलकुमार पावरा यांनी पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल केली नाही.परंतु बिरसा फायटर्सच्या इशा-यानंतरही करोडोंचा भ्रष्टाचार केलेले आदिवासी विकास विभाग हेच खाते विजयकुमार गावित यांना देण्यात आल्यामुळे आदिवासी समाजात नाराजी निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments