Advertisement

नागपूर राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे सैनिकी संमेलन


(एसडीआरएफ देशसेवेसाठी 24 तास सज्ज)

Tribal Tiger 47 News चॅनलउ

  उपसंपादक

एस के पंधरे महा सहसंघटक
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ

नागपूर/हिंगणा :- राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर येथे सैनिकी संमेलन पार पडले. सहायक समादेशक कृष्णा सोनटक्के यांनी माहिती देतांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कर्मचाऱ्यांच्या  अडी अडचणी जाणून घेतल्यानंतर, त्यावर काय उपाय योजना करण्यात येणार यावर भर दिले.

सर्वप्रथम महाराष्ट्रभर पावसाळ्यात पुर्वतयारी करण्यात आली आहे. तर साहीत्य, वाहणे, सुसज्जीत ठेवून असल्याबद्दल माहिती दिली आहे. येणाऱ्या पावसाळ्यात पुरपरिस्थिती व आपत्ती उद्भवल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद दल चोवीस तास सज्ज असते. अशी माहिती सहायक समादेशक कृष्णा सोनटक्के यांनी सांगितले आहे.

यावेळी दोन सक्रिय टीम आढळून आल्या आहेत. सक्रिय टीमचे कमांडर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप भजणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बादल विश्वास, सब टीम कमांडर मनोज परिहार, राजेश भारद्वाज, राजेश ढवरे, टीमचे सर्व रेस्कुव्हर राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर येथील एक टीम मान्सून करिता गडचिरोली येथे पुरपरिस्थिचा सामणा करण्यासाठी दि. १५ जून २०२२, रोजी पासून तैनात करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments