Advertisement

महराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नामदेव किरसान आणि मित्र परिवाच्या वतीने पूरग्रस्तांना अन्य धान्य किटचे वितरण

गडचिरोली:// महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नामदेव किरसान यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात १ लक्ष रुपयाचे अन्यधान्य किट चे वितरण करणार असल्याचे जाहीर केले होते त्या नुसार आज अहेरी तालुक्यातील पूरग्रस्त भागात गरजूंना आज अन्न धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंनी तयार केलेल्या किटचे वितरण करण्यात आले. अन्यधान्य वितरण गाडीला गडचिरोली शहर कॉंग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, जितेंद्र मुनघाटे, अजय लोंढे, घनशाम वाढई, भूषण कुणघाडकर यांनी हिरवी झेंडी दाखवली.
  
अहेरी तालुक्यातील अहेरी आणि अलापल्लली येथे अन्य धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी अन्यधान्य व जिवनावश्यक वस्तुंचे वितरण करतांना अहेरी तालुका कॉंग्रेस अध्यक्ष मुस्तक हकीम, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष रझाक पठाण, एटापल्ली नगरपंचायत चे नगरसेवक किसन हिचामी, नगरसेवक, निजान पेंदाम, एटापल्ली युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मोहन नामेवार, आलापल्ली शहर अध्यक्ष रुपेश बंदेला, तालुका कॉंग्रेस सोशल मिडीया प्रमुख सतिष मडावी, शाकिर भाई, सतिष चेरलावार, विलास शेंडे, आंनंद रामगिरवार, संतोष वसाके, अशोक मडावी, देऊ पुगांटी सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी.

Post a Comment

0 Comments