Advertisement

डव्वा निवासी शाळेत शालेय व शैक्षणिक साहित्य वाटप

   तालुक्यातील डव्वा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा या (दि. ५) दुपारी ०२.०० च्या सुमारास शाळेतील वर्ग सहावी ते दहावी सर्व विद्यार्थीनींना शालेय व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सयाज कल्याण कार्यालय गोदिंयातर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा डव्वा, यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. संध्या दहिवले यांच्या शुभहस्ते शालेय पाठ्यपुस्तके, रजिस्टर, वह्या, शालेय गणवेष, नाईट ड्रेस, स्पोर्ट्स ड्रेस, कंगवी, केसांचे, साबन, टूथब्रश, टूथपेस्ट, सौदर्य प्रसादने साहित्य असे जीवनात उपयोगी सर्व साहित्य वाटप करण्यात आले. सदर साहित्य याचा चांगला वापर करून उपयोगी आणावा अशा सुचनाही दिल्या. 
वाटप करताना शाळेतील मुख्याध्यापिका कु. संध्या दहिवले, सहाय्यक अद्यापक मुन्नाभाई नंदागवळी, आवेश राऊत, विद्यार्थीनिनी सुरभी वैद्ये, वैशाली धानगुण, स्तुती चव्हाण यांनी प्रामुख्याने सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments