Advertisement

निरपराध लोकांना अडकविणा-यांना मंत्रीपद नको: सुशिलकुमार पावरा

*दापोलीचे आमदार योगेश कदम यांना मंत्रीपद देण्यास विरोध*

*अन्यथा मंत्रालयासमोर माझे उपोषण: सुशिलकुमार पावरा*

दापोली: रामदास कदम माजी पर्यावरण मंत्री यांनी आपल्या मंत्रीपदाचा दुरूपयोग करत अनेक निरपराध लोकांना खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम दापोली मतदारसंघातील आमदार तुमच्या गटात आहे.या गटातील रामदास कदम,अरूण कदम जिल्हा परिषद सदस्य रत्नागिरी (अण्णा कदम) रामदास कदम यांचे भाऊ यांनी माझ्यासारख्या निरपराध शिक्षकाला खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकवले आहे,हे पुराव्यानिशी समोर आले आहे.शिवसेनेचे माजी मंत्री तथा पालकमंत्री अनिल परब यांना सुद्धा साॅई रिसाॅर्ट प्रकरणात अडकवण्यात रामदास कदम यांचा हात असल्याचे ऑडिओ टिव्हीवर दाखवण्यात आले.रामदास कदम हे शिवसेनेच्याच मंत्र्याविरोधात कसे षडयंत्र रचतात, हे जनतेसमोर आले आहे.त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला खोट्या गुन्ह्यात अडकवणे हे त्यांच्यासाठी साधे काम आहे.या नेत्यांच्या अशा वाईट कामांमुळे शिवसेना पक्षाबद्दल सामान्य जनतेत प्रतिमा मलीन होत आहे.एका चांगल्या पक्षाला ही लोक आपल्या पदाचा दुरूपयोग करत, मनमानी करत,गुंडगिरी व जबरदस्ती करत बदनाम करत आहेत.
              विजय बाईत तत्कालीन प्रभारी गटशिक्षण अधिकारी तथा विस्तार अधिकारी खेड हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22 हजार रुपये घेणे या भ्रष्टाचारात, बोगस अपंग प्रमाणपत्र,षडयंत्र प्रकरणात स्वत:ला वाचविण्यासाठी 8 आदिवासी शिक्षकांकडून जबरदस्तीने बान्ड पेपरवर सह्या करवून घेणे,शिक्षकांकडून आर्थिक मागणी अशा गंभीर प्रकरणात दोषी ठरले.अशा दोषी व भ्रष्टाचारी बोगस अधिका-यांना कारवाई पासून वाचविण्यासाठी रामदास कदम, अरूण कदम जिल्हा परिषद सदस्य हे माझ्याविरोधातल्या षडयंत्र प्रकरणात शामिल असल्याचे खेड येथील पोलिसांचे संभाषण वायरल होत आहे.हे नेते निरपराध लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे काम करतात असे पोलीस, अधिकारी,शिक्षक व जनता उघडपणे बोलत आहेत. 
                    सामान्य माणसांना खोट्या गुन्ह्यात अडकवून आयुष्य उध्वस्त करण्याचे काम रामदास कदम, अरूण कदम हे करीत असल्यामुळे जनतेत या लोकांची प्रतिमा खराब झाली आहे.सत्तेचा व पदाचा दुरूपयोग करत असल्याचे लोकांना स्पष्ट दिसत आहे.म्हणून रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांना चूकून मंत्रीपद दिल्यास पुन्हा रामदास कदम प्रमाणेच योगेश कदम कडून निरपराध लोकांवर अन्याय, अत्याचार होऊ शकतात. म्हणून दापोलीचे आमदार योगेश कदम यांना कुठल्याही प्रकारचे मंत्रीपद देऊ नये,ही विनंती. अन्यथा मंत्रालयासमोरच माझे 301 वे माझे उपोषण मी सुरू करीन,प्रसंगी राज्यात 230 शाखा असलेली आमची बिरसा फायटर्स संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करेल.याची नोंद घ्यावी.आपल्या मंत्रीमंडळास आमच्या संघटनेकडून शुभेच्छां!अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.

Post a Comment

0 Comments