Advertisement

वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक पदी सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांची निवड

           एस के पंधरे
           उपसंपादक
Tribal Tiger 47 News / 
महाराष्ट्र सहसंघटक राज्य राष्ट्रीय विश्व पञकार संघ 

साकोली (  9 जून ) वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा ची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे आदेशान्वये ही यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये ज्यांना पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात वीस वर्षाचा अनुभव आहे असे डी जी रंगारी यांच्या कार्याची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या भंडारा जिल्हा संघटक पदी नियुक्त करण्यात आली
 डी जी रंगारी हे गेल्या वीस वर्षात फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या प्रचार आणि प्रसार आणि प्रबोधन सातत्याने करत आलेले आहेत ते सध्या जानेवारी 2022 ला शिक्षक या पदावरून निवृत्त झालेले आहेत त्यांच्या सामाजिक कार्याचे दखल घेऊन त्यांच्याकडे भंडारा जिल्ह्यात फुले, शाहू आंबेडकर विचारधारा पक्षाच्या माध्यमातून एक चळवळ म्हणून वाढवण्याचे काम व वंचित बहुजन आघाडी वाढविण्याची जबाबदारी डी जी रंगारी यांच्याकडे दिलेली आहे व ती त्यांनी प्रामाणिकपणे स्वीकारलेली आहे व सांगितलेला आहे की फुले शाहू आंबेडकर विचारधारा भंडारा जिल्ह्यात व पक्षाचे काम वाढवून पक्ष मजबूत करण्याची मत सुद्धा डी जी रंगारी यांनी एका प्रसिद्ध पत्रकार मध्ये कळविलेला आहे
त्यांच्या निवडीबद्दल भंडारा जिल्हा अध्यक्ष धनपाल गडपायले, महासचिव दिलीप वानखेडे ,उपाध्यक्ष उमाकांत रामटेके ,डॉ सुनील जिवतोरे, अजय रामटेके ,सचिव अमित वैद्य ,यादवराव गणवीर ,सल्लागार चरण मेश्राम ,राधेश्याम कावळे ,भंडारा गोंदिया जिल्ह्याचे महिला निरीक्षक सुनिता टेंभुर्णे ,साकोली चे निरीक्षक एड सुजाता वालदेकर ,साकोली चे जगदीश रंगारी, महिला तालुका आघाडीचे तनुजा नागदेवे, युवा कार्यकर्ता प्रशिक मोरघरे ,रोशन भोवते ,पुष्पा बडोले ,आम्रपाली मोटघरे, गीता खंडारे व इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments