Advertisement

दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित विद्याभारती प्राथमिक विभागात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

  दापोली:विद्याभारती प्राथमिक विभागात बुधवार दि. १३ जुलै रोजी शाळेच्या चैतन्य सभागृहात गुरुपूजा व मातृ- पितृपूजा करुन गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात दीपपूजा व दिपमंत्र व गुरुमंत्राने झाली .सौआस्मिता भांबीड यांनी प्रास्ताविकातून गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा उद्देश विषद केला त्यानंतर श्री रमेश नवरत यांनी गोष्टीरुपाने गुरूच आपल्या जीवनातील महत्त्व मुलांना पटवून दिले . सौ संध्या रेवाळे यांनी मातृ पितृ प्रति असलेला आदर गाण्यातून व्यक्त केला यानंतर मुलांनी विधिव्रत आपल्या आईबाबांच पूजन केल या निमित्ताने पर्यावरण, निसर्ग, पशुपक्षी, पुस्तके, इंटरनेट, संगणक, शाळा, शिक्षक , अशा सर्व सजीव निर्जीव गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करु अशी ग्वाही दिली. पालक मनोगतातून शाळेने केलेल्या स्तुत्य उपक्रमाबाबत शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले सदर कार्यक्रम सजावटीसाठी श्री अभिषेक बुरटे , सौ.मनिषा मेहता व ताईवर्गाने विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. उमेश रेवाळे यांनी केले शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता येईल सदर कार्यक्रमास मान्यवर संस्थाचालक यांनी शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments